Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

Highlights

  • या ई-स्कूटरची किंमत Rs 83,999 (ex-showroom) आहे.
  • Okaya Faast F2F मध्ये 70–80 km ची रेंज मिळेल.
  • F2F मध्ये 800W-BLDC-Hub Motor देण्यात आली आहे.

ओकायानं भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही नवीन ई-स्कूटर कंपनीनं आपल्या Faast सीरीजमध्ये सादर केला आहे. जिला Okaya Faast F2F असं नाव देण्यात आलं आहे. ही एक किफायतशीर बॅटरी असलेली स्कूटर आहे जी शानदार रेंज आणि दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये आली आहे. तसेच, कंपनीनं Faast F2F मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले आहेत. तसेच कंपनीनं हिचा लूक देखील आकर्षक ठेवला आहे. भारतीय बाजारात ओकाया फास्ट F2F 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होईल.

Okaya Faast F2F ची किंमत

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Okaya नं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लाँच केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Rs 83,999 (ex-showroom) मध्ये सादर केली आहे. मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सियान, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाईट असे 6 कलर ऑप्शन उपलब्ध होतील. हे देखील वाचा: PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही

Okaya Faast F2F ची खासियत

ओकाया फास्ट एफ2एफ मध्ये कंपनीनं टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हाइड्रोलिक रियर शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट की (Key) आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळतो, ज्यात सर्व आवश्यक माहिती दिसते. तसेच यात स्टाइलिश डीआरएल हेड-लॅम्प आणि एजी टेल-लॅम्पचा समावेश आहे.

दमदार मोटर आणि शानदार बॅटरी

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 800W-BLDC-हब मोटर दिली आहे, जी 60V36Ah (2.2 kWh) लिथियम आयन – LFP बॅटरीसह जोडण्यात आली आहे. तसेच, बॅटरीवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी हाई सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करते. तसेच ही किफायतशीर ई-स्कूटर विद्यार्थी आणि तरुण प्रोफेशनल्सचा विचार करून बनवण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 60V क्षमता असलेली 36Ah (2.2 kWh) लिथियम आयन- LFP बॅटरी दिली आहे जी दीर्घकाळ चालेल. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी दीर्घायुषी आणि हाय टेंप्रेचरवर काम करणारी आहे. तसेच बॅटरीवर 2 वर्ष / 20,000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

रेंज आणि टॉप स्पीड

Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 55 किमी आहे. तसेच यात 10 इंचाचे ट्यूबलेस टायर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर देखील देण्यात आले आहेत, जे खडे असलेल्या रस्त्यावर देखील आरामदायक प्रवासाचा आनंद देतात. स्कूटर 4-5 तासांमध्ये फुल चार्ज करून 70-80KM चालवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here