कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

Highlights

  • इलेक्ट्रिक स्कूटरचं फ्रंट सस्पेंशन तुटल्यामुळे मोठा अपघात घडला.
  • Ola S1 Pro चालवणारी महिला ICU मध्ये दाखल.
  • पतीने ट्विटरवर दिली दुर्घटनेची माहिती

भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक जुन्या नव्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात अजमावत आहेत. परंतु राइड शेयरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात करणारी OLA या सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात आघाडीवर आहे. परंतु फक्त जास्त स्कूटर्स विकण्याच्या बाबतीत कंपनी पुढे नसून खराब इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबीतीत देखील ओलाचे नाव जास्त पुढे येत आहे.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या समस्या संपता संपत नाहीत. गेल्यावर्षी अनेक रिपोर्ट्समधून कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोष असल्यामुळे ग्राहकांना समस्या येत असल्याचे समोर आले होते. तर आता एका नवीन रिपोर्टमधून समोर आले आहे की Ola S1 Pro स्कूटरचे फ्रंट सस्पेंशन अचानक तुटून इतका मोठा अपघात झाला की महिला चालकाला गंभीर दुखापत झाली आणि तिला ICU मध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती महिलेच्या नवऱ्याने ट्विटरवर दिली आहे.

35 च्या स्पीडवर होती ई-स्कूटर

समकित परमार यांनी सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्टच्या माध्यमातून आपल्या पत्नीसोबत घडलेल्या अपघाताची माहिती दिली आहे. समकितच्या पोस्ट नुसार, रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांची बायको 35 किमी/तास स्पिडनं ई-स्कूटर चालवत होती. परंतु अचानक पुढील चाक स्कूटरपासून वेगळं झालं. यामुळे महिलेची स्कूटी जोरात रस्त्यावर पडली ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्या ICU मध्ये आहेत.

समकित परमार यांनी Ola आणि Ola Electric चे संस्थापक व सीईओ भाविश अग्रवाल यांना देखील आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. तसेच समकितनं एका ट्विटला उत्तर देताना सांगितलं आहे की ओला टीम अपघाताची पाहणी करण्यासाठी आली होती आणि बाइक घेऊन गेली. टीमने बाइक वापस देणार असल्याचं सांगितलं परंतु आम्हाला बाइक नको तिची किंमत द्या अशी मागणी परमार यांनी केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे दुर्घटना घटण्याची ही काही पहिली वेळ नाही. अशा दुर्घटनांच्या वेळी Ola वाहनाचा स्पीड आणि अन्य डेटा अपडेट करते.

इतर लोकांनी देखील केली ओलाची तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here