जेव्हापासून भारतात 5G नेटवर्कची सुरूवात झाली आहे तेंव्हापासून बहुतांश मोबाईल वापरकर्ते 5G स्मार्टफोनकडे वळत आहेत. तथापि, काही ग्राहक असेही आहेत जे बजेटअभावी या सेवेपासून वंचित राहिले आहेत. अशा ग्राहकांसाठी आम्ही एक उत्तम डील घेऊन आलो आहोत. या अंतर्गत फक्त 7,499 रुपयांमध्ये 5G डिव्हाईस मिळेल. हा POCO M6 5G नावाने गेल्या वर्षी लाँच झाला होता. ज्यावर सध्या ऑफर सुरू आहे. यात 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 5000 एमएएच बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ चिपसेट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. चला, पुढे तुम्हाला ऑफर आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
POCO M6 5G ची ऑफर्स आणि किंमत
- POCO M6 5G स्मार्टफोन ऑफरमध्ये फक्त 7,499 रुपयांत मिळत आहे. यावर कंपनीकडून 500 रुपयांची झटपट बँक सूट दिली जात आहे.
- ही फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत आहे. तुम्ही खाली दिलेल्या टिझर पोस्टरमध्ये देखील ऑफर तपशील पाहू शकता.
- जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.
- जर तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी द्यायची नसेल तर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. ज्याच्या मदतीने 3 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा डिव्हाईस खरेदी करता येईल.
कुठे करायची खरेदी
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे, परंतु सध्या त्याचा लवकर ॲक्सेस सुरू झाला आहे. जो फक्त व्हीआयपी ग्राहकांसाठी आहे. तथापि, तुम्ही आज आणि विक्री चालू होईपर्यंत POCO M6 5G स्मार्टफोनला फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतील.
फ्लिपकार्ट लिंक
तुम्हाला सांगतो की हा मोबाईल आणखी तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये देखील येतो. डिव्हाईसच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी पर्यायाची किंमत 9,249 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी ची किंमत 9,499 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी ची किंमत 13,499 रुपये आहे. या मॉडेल्सवर देखील बँक ऑफर आणि कॅशबॅकसह ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे.
POCO M6 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: POCO M6 5G फोनमध्ये 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्यावर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 लावण्यात आला आहे.
- प्रोसेसर: मोबाईलमध्ये ब्रँडने मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेट दिला आहे.
- स्टोरेज: डिव्हाईस 8 जीबी रॅम + 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो. यात रॅमला वाढवण्यासाठी टर्बो सपोर्ट आणि इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.
- कॅमेरा: POCO M6 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एआय कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा एआय फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
- बॅटरी: डिव्हाईसमध्ये 5000एमएएच ची बॅटरी आणि 18 वॉट फास्ट चार्जिंग दिली गेली आहे.
- इतर: फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G, 4G, ब्लूटूथ, वाय-फाय अशी अनेक फिचर्स आहेत.
- ओएस: हे अँड्राईड 13 आधारित एमआययूआय 14 वर बेस्ड आहे. यासोबत दोन सॉफ्टवेअर आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.















