OnePlus 11R Solar Red Edition भारतात झाला लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत आणि काय आहे यात खास

फ्लॅगशिप किलर नावाने फेमस टेक ब्रँड वनप्लसने आपल्या भारतीय चाहत्यांसाठी एक जबरदस्त भेट सादर केली आहे. कंपनीने आपल्या फेमस मोबाईल OnePlus 11R चा नवीन Solar Red Edition भारतात लाँच केला आहे. जबरदस्त स्पेसिफिकेशन असलेला हा वनप्लस फोन आजपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्लस 11 आर सोलर रेड एडिशन किंमत व स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus 11R Solar Red ची किंमत

वनप्लस 11 आर सोलर रेड एडिशन 8GB RAM + 128GB Storage वर लाँच झाला आहे ज्याची किंमत 35,999 रुपये आहे. तसेच याचे कंफिग्रेशन असलेला फोनचा Sonic Black आणि Galactic Silver कलर मॉडेल 32,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. तसेच OnePlus 11R 16GB RAM + 256GB Storage किंमत 43,999 रुपये आहे. फोनचे सर्व मॉडेल तसेच नवीन वनप्लस 11 आर रेड एडिशन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन

  • 6.7″ 120 हर्ट्झ सुपर फ्लूइड अ‍ॅमोलेड स्क्रीन
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर
  • 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 100 वॉट सुपरवूक चार्जिंग
  • 5,000 एमएएचची बॅटरी

डिस्प्ले
वनप्लस 11आर 20.1:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 2772 X 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ​पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन सुपर फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 360 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या स्क्रीनवर इन-​डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 10 बिट कलर डेप्थ, 450 पीपीआय सारखे फिचर्स पण आहेत.

परफॉर्मन्स
वनप्लस 11 आर 5 जी फोन अँड्रॉईड 13 आधारित ऑक्सिजन ओएस 13 ला सपोर्ट करतो ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट आहे. हा प्रोसेसर पण 4 एनएम फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 3.2 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी OnePlus 11R ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी
पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 आर स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच या मोठ्या सोबतच मोबाईल फोनला 100 वॉट फास्ट चार्जिंगसह करण्यात आला आहे. ब्रँडनुसार हा फोन फक्त 10 मिनिट चार्जिंगला लावल्यावर मात्र बॅटरी इतकी चार्ज होते की सामान्य वापरासाठी फोन एक दिवसाचा स्टेडबॉय टाईम देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here