एमआरपीवर 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध; फ्लिपकार्टवरून घेता येणार विकत

सणासुदीच्या दिवसांमध्ये जर नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगली वेळ आहे. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स गॅजेट्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart देखील समावेश आहे. कंपनी आकर्षक ऑफर्स आणि सेल अंतगर्त अनेक अच्छे स्मार्टफोन कमी किंमतीत विकत आहे. यात Vivo T1 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.

Vivo T1 5G Price आणि ऑफर्स

भारतात 5G ची सुरुवात झाल्यापासून आता प्रत्येकाला 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे. त्यामुळे कमी किंमतीती 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही Flipkart वरून vivo T1 5G स्मार्टफोन विकत घेऊ शकता. Flipkart वर Vivo T1 5G स्मार्टफोनचा 6GB RAM +128 GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्हाला 20,990 रुपयांच्या ऐवजी फक्त 16,990 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे हा फोन 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि चकाचक डिस्प्लेसह येतोय सर्वात शक्तिशाली OnePlus 11; लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Vivo T1 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर पाहता HDFC, SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. फोनवर नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या फोनवर 16,250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता.

Vivo T1 5G Specifications

स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा Full HD + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज वाढवण्याची मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं तुम्ही 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. हे देखील वाचा: OPPO कडून दिवाळीची शानदार भेट! 1-2 नव्हे तर 5 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी

OS पाहता Vivo T1 5G फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. हीटिंगपासून वाचण्यासाठी फोनमध्ये कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP ची तिसरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here