OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री

चाइनीज कंपनी वनप्लस आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स साठी नेहमीच चर्चेत असते. आता कंपनीने स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही मार्केट मध्ये पाऊल टाकण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच आपली पहिली स्मार्ट टीव्ही रेंज सादर करणार आहे, जिचे नाव OnePlus TV असेल.

आता वनप्लस स्मार्ट टीव्ही सेगमेंट बद्दल कंपनीचे सीईओ पेटे लाऊ यांनी सांगितले आहे कि वनप्लस टीव्ही एक्सक्लूसिवली भारतात लॉन्च केला जाईल जी अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

अमेझॉन इंडिया वर सध्या टीव्ही साठी एक वेगळी माइक्रोसाइट बनवण्यात आली आहे, ज्यात ‘Notify Me’ चा ऑप्शन येत आहे. कंपनीने हे आधीच सांगितले आहे कि OnePlus TV सप्टेंबर मध्ये लॉन्च केली जाईल आणि हि इंडियन मार्केट साठी एक्सक्लूसिवली लॉन्च केली जाईल.

तसेच समोर येत असलेल्या माहिती नुसार टीव्ही सोबत कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल. बोलले जात आहे कि कंपनी आपला टीव्ही आणि फोन्स एकाच दिवशी सादर करू शकते.

कंपनीच्या सीईओनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि टीव्ही डेवलप करताना कंपनीचे लक्ष याच्या इमेज आणि साउंड क्वालिटी वर होते. पेटे लाऊ म्हणाले कि यूजर्स साठी इमेज क्वॉलिटी सर्वात महत्वाची आहे आणि यासाठी कंपनीने आपल्या टीव्हीची सर्वोत्तम टीव्ही सोबत तुलना केली आहे.

OnePlus स्मार्ट टीव्हीचे काही मॉडेल्स TPV Display वर बनलेले असतील तर कंपनी OLED पॅनल वर पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. आशा आहे कि OnePlus स्मार्टटीव्ही मध्ये 4K HDR स्क्रीन, एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम आणि AI टेक्नोलॉजी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here