शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन

OnePlus यंदा भारतात 6 स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीनं भारतात आपल्या नॉर्ड सीरिजमध्ये काही हँडसेट सादर केले आहेत, तसेच फ्लॅगशिप वनप्लस 10 सीरिजचा देखील विस्तार केला आहे. आणि आता लवकरच आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. OnePlus 8T नंतर कंपनीनं T सीरीजमध्ये कोणताही स्मार्टफोन लाँच केलेला नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार OnePlus 10T लाँच करण्याची तयारी सुरु आहे. आगामी वनप्लस भारतात ऑगस्टमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

प्रसिद्ध टिपस्टर DigitalChatStation नं आगामी OnePlus 10T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. त्यानुसार, स्मार्टफोनमध्ये 16GB LPDDR5 RAM चा ऑप्शन दिला जाईल, जो वनप्लसचा सर्वात जास्त रॅम असलेला स्मार्टफोन असेल. वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनचा हा व्हेरिएंट AnTuTu बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला आहे, ज्याने 1131151 बेंचमार्क पॉइन्ट्स मिळवून शानदार कामगिरी केली आहे. हा फोन 8GB आणि 12GB रॅमच्या मॉडेलसह देखील सादर केला जाईल.

OnePlus 10T ची संभाव्य किंमत

OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच कंपनी हा डिवाइस मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल. OnePlus 10T स्मार्टफोन पुढील महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर
  • 12GB पर्यंत RAM, 256GB स्टोरेज
  • Android 12 OS
  • 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4800mAh बॅटरी, 150W फास्ट चार्जिंग

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120H रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. तसेच यात HDR10+, RGB आणि डिस्प्ले P3 कलर गमुटचा सपोर्ट देखील मिळेल. या डिस्प्लेला कोर्निंग ग्लास लेयरची सुरक्षा देण्यात येईल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर मिळेल, जो क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि शक्तिशाली चिपसेट आहे. पहिल्यांदाच वनप्लस स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो, सोबतीला 256GB स्टोरेज मिळेल. वनप्लसचा हा फोन Android 12 आधारित OxygenOS वर चालेल.

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. ग्लोबल व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असू शकतात. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 16MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

OnePlus 10T मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, एक्स एक्सिम लीनियर मोटर आणि 4800mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2×2 MIMO, WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth 5.3, NFC, SBC & aptX HD & LDAC, NFC, आणि USB Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here