OnePlus Nord 4 चे लाँच पूर्वी समोर आले रेंडर्स, पाहा कशी मिळेल डिझाईन

वनप्लस ब्रँडचा Nord 4 पुढच्या आठवड्यात 16 जुलैला भारतात लाँच केला जाईल. याला घेऊन कंपनी पण टिझर शेअर करत आहे. तसेच, बाजारात येण्याच्या आधी OnePlus Nord 4 चे हाय-क्वॉलिटी रेंडर ऑनलाईन समोर आले आहेत. ज्यात फोनची डिझाईन आणि कलर ऑप्शनची पण माहिती मिळाली आहेत. चला, पुढे लीक माहिती सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus Nord 4 रेंडर्स (लीक)

  • OnePlus Nord 4 चे रेंडर्स आणि डिझाईनची माहिती अँड्रॉईड हेडलाइंस आणि ऑनलीक्सद्वारे शेअर करण्यात आली आहे.
  • OnePlus Nord 4 मध्ये सेल्फी घेण्यासाठी फ्रंट पॅनलवर पंच-होल कटआऊट, फ्लॅट कार्नर आणि स्क्रीनच्या चारही बाजूला पातळ बेजेल्स आहेत.
  • वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या बाजूला आहे. तुम्ही डाव्या बाजूला वर अलर्ट स्लाइडर पण पाहू शकता.
  • फोनमध्ये मेटल डिझाईन पाहायला मिळते. यात मध्ये फ्रेम मध्ये चांगल्या ग्रिपसाठी घुमावदार किनाऱ्यांसह एक बॉक्सी शेप आहे.
  • फोनच्या मागील बाजूस ड्युअल-टोन डिझाईन दिसते. जिथे ड्युअल-कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश आहे.
  • बॅक पॅनलवर मध्ये वनप्लसचा लोगो आहे. तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट, स्पिकर आणि सिम ट्रे सेक्शन खालच्या बाजूला आहे. तसेच, वरती सेकंडरी मायक्रोफोन आहे.
  • रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की OnePlus Nord 4 ब्लॅक, मिंट आणि व्हाईट/सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.

OnePlus Nord 4 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड 4 मध्ये 6.74 इंचाचा 1.5K OLED Tianma U8+ डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2150 निट्स पीक ब्राईटनेस दिले जाऊ शकते.
  • चिपसेट: मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 SoC लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज आणि रॅम: वरती दिलेल्या चिपसेटसह 8GB रॅम आणि संभवत 128GB तथा 256GB सारखे दोन स्टोरेज पर्याय येऊ शकतात.
  • बॅटरी: फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,500mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • कॅमेरा: OnePlus Nord 4 मध्ये बॅक पॅनलवर 50MP चा प्रायमरी आणि 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा लेन्स लावला जाऊ शकतो.
  • इतर: हा डिव्हाईस सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पिकर, X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, अलर्ट स्लाईडर, कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4 आणि NFC सारखे फिचर्ससह येऊ शकतो.

OnePlus Nord 4 ची किंमत (संभाव्य)
आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord 4 ची भारतात किंमत 31,999 रुपये ठेवली जाऊ शकते. ही याच्या बेस मॉडेलची किंमत असू शकते. या नवीन फोनसह 16 जुलैला OnePlus Pad 2, Nord Buds 3 Pro आणि इतर प्रोडक्ट्स लाँच होण्याची घोषणा झाली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here