OnePlus Nord CE 2 Lite 5G वर डिस्काउंट ऑफर

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर OnePlus चे स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत. त्यामुळे कंपनीचे मिड रेंज हँडसेट देखील बजेटमध्ये बसू लागले आहेत. तुम्ही जर वनप्लसचे चाहते असाल तर या संधीचा लाभ घेऊ शकता. अ‍ॅमेझॉनवर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लसच्या या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच एक्सचेंज बोनसमुळे या हँडसेटची किंमत आणखी कमी होईल.

OnePlus Nord CE 2 Lite 5G वरील ऑफर

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची इन्स्टंट सूट मिळेल. त्यामुळे या हँडसेटची इफेक्टिव्ह प्राईस 17,999 रुपये होईल. परंतु जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही आणखी जास्त बचत करू शकता.

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन विकत घेताना तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडीशन चांगली असेल तर तुम्ही सहज 4000 रुपयांपर्यंची बचत करू शकता. त्यामुळे नवीन OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट तुम्ही फक्त 13,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता. हे देखील वाचा: ग्राहकांना जोरदार झटका! पुन्हा महागणार Smartphones; येत्या काही महिन्यांत होऊ शकते भाववाढ

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर टॉप एन्ड व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्यासाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. वनप्लसचा Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन ब्लू टाइड आणि ब्लॅक डस्क कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आहे, तसेच 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. कंपनीनं डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट दिला आहे. ज्यात 16MP चा फ्रंट कॅमेरा फिट करण्यात आला आहे.

वनप्लसच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, ज्याचे अपर्चर f/1.7 आहे. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देखील मिळतो. हे देखील वाचा: काय रॅम, काय बॅटरी, काय फीचर्स… सगळं दमदार; 18GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Asus चे फोन लाँच

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. यात Qualcomm Snapdragon 695 SoC देण्यात आली आहे. जोडीला फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. वनप्लसचा हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here