OnePlus Nord CE 4 Lite किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि भारतातील लाँच डेट: कोणती माहिती लीक झाली आहे ते जाणून घ्या

कमीत कमी किमतीत OnePlus Smartphone विकत घ्यायचा असेल तर, मग कंपनीची ‘नॉर्ड’ सीरिज तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. ही मोबाईल सीरिज मध्यम बजेटमध्ये आणण्यात आली असून, त्याचे जवळपास सर्व मॉडेल युजर्सना पसंत पडले आहेत. या सीरिजमधील पुढील स्मार्टफोन OnePlus Nord CE 4 Lite 5G असणार आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. मात्र, कंपनीने या मोबाईल विषयीची माहिती गुप्त ठेवली आहे. या मोबाईलची लीक झालेली माहिती स्पेसिफिकेशनसह आपण पुढे वाचू शकता.

OnePlus Nord CE 4 Lite किंमत

हा आगामी OnePlus स्मार्टफोन मध्यम बजेटमध्ये आणला जाईल. OnePlus Nord CE 4 Lite ची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या Nord फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये असू शकते. तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

OnePlus Nord CE 4 Lite स्पेसिफिकेशन

 • 6.6″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
 • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1
 • 8GB RAM + 256GB स्टोरेज
 • 50 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
 • 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
 • 5,500 एमएएच बॅटरी

डिस्प्ले
या लीकवर विश्वास ठेवला तर, OnePlus Nord CE 4 Lite 5G फोन 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाच्या FHD+ डिस्प्लेवर लाँच होईल. याचा डिस्प्ले पंच-होल स्टाईलचा असणार आहे. हा डिस्प्ले AMOLED पॅनेलवर बनविण्यात आला असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits ब्राईटनेसला सपोर्ट करेल. Nord CE 4 Lite मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञान देखील पाहिले जाऊ शकते.

प्रोसेसर
OnePlus Nord CE 4 Lite मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 6 gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची शक्यता आहे. या ऑक्टा-कोर प्रोसेसरमध्ये 2.2GHz क्लॉक स्पीडसह चार Cortex-A78 कोर आणि 1.8GHz क्लॉक स्पीडसह चार Cortex-A55 कोर आहेत.

ओएस
समोर आलेल्या लीकनुसार, OnePlus Nord CE 4 Lite 5G फोन नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम Android 14 वर लाँच केला जाईल, तो OxygenOS 14 सोबत काम करेल. अशी चर्चा आहे की, हा मोबाईल 2 वर्षांच्या अँड्रॉईड अपडेटसह आणि 3 वर्षांच्या सुरक्षा अपडेटसह येईल जो Android 16 साठी आधीच तयार असणार आहे.

स्टोरेज
OnePlus Nord CE 4 Lite 5G फोन भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. स्टोरेजच्या बाबतीत, हा फोन बाजारात उपलब्ध असलेल्या Nord CE 4 सारखा असू शकतो, जो 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच या फोनमध्ये 1TB मेमरी कार्ड सपोर्ट देखील मिळू शकतो.

कॅमेरा
OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. या स्मार्टफोनच्या रिअर पॅनलमध्ये F/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सल मुख्य सेन्सर दिला जाईल जो FOV 77° आणि OIS ला सपोर्ट करेल. यासह, रिअर सेटअपमध्ये F/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देखील असणार आहे. तर OnePlus Nord CE 4 Lite सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सह लाँच केला जाऊ शकतो.

बॅटरी
OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनला पॉवर बॅकअपसाठी 5,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. सोबतच 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला चार्जर दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord CE 4 Lite भारतातील लाँच

OnePlus Nord CE 4 Lite लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. रिपोर्ट्स आणि लीकनुसार हा मोबाईल भारतात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला लाँच केला जाईल. आपण अपेक्षा करू शकतो की, Nothing ब्रँड आपल्या CMF Phone 1 फोनबाबत सांगायला सुरुवात करेल, त्याचप्रमाणे, OnePlus Nord CE 4 Lite च्या जाहिराती देखील दिसू लागतील.

OnePlus Nord CE 4 Lite स्पर्धा

OnePlus Nord CE 4 Lite स्मार्टफोन मध्यम बजेटमध्ये आणला जाईल. या किंमतीमध्ये OnePlus Nord CE 4 Lite ची बाजारात Nothing Phone 2a, iQOO Z9 5G, realme Narzo 70 Pro, Vivo T3 5G तसेच Motorola Edge 50 Fusion या स्मार्टफोनसोबत स्पर्धा असणार आहे. जर तुम्ही यापैकी कोणताही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही OnePlus Nord CE 5 Lite ची काही दिवस प्रतिक्षा करू शकता.

OnePlus Nord CE 4 ची किंमत

 • 8GB RAM + 128GB Storage = ₹24,999
 • 8GB RAM + 256GB Storage = ₹26,999

हातात असलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE4 5G या फोनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम सह दोन स्टोरेज पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याचे 128 जीबी मॉडेल 24,999 रुपयांना आणि 256 जीबी मॉडेल 26,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

OnePlus Nord CE 4 स्पेसिफिकेशन

 • 6.7″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
 • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3
 • 8GB व्हर्चुअल रॅम
 • 50 डुअल रियर कॅमेरा
 • 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
 • 5,500 एमएएच बॅटरी
 • 100 वॅट फास्ट चार्जिंग

डिस्प्ले
OnePlus Nord CE 4 5G फोन 2412 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले फ्लूईड अ‍ॅमोलेड पॅनेलवर तयार केला आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2160 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करतो.

प्रोसेसर
हा OnePlus फोन Android 14 वर लाँच करण्यात आला आहे जो Oxygen OS 14 वर काम करतो. प्रोसेसिंगसाठी यामध्ये क्वालकॉम Snapdragon 7 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 2.63 गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालते. तसेच यात 8GB एक्सपेंडेबल रॅम तंत्रज्ञान देखील आहे.

कॅमेरा
OnePlus Nord CE 4 5G फोनच्या मागील पॅनलवर एक 50 मेगापिक्सेल Sony LYT600 मुख्य सेन्सर देण्यात आला आहे, जो 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आयएमएक्स 355 लेन्सच्या संयोगाने कार्य करतो. तसेच OnePlus Nord CE 4 इंस्टाग्राम रिल्स तयार करण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करते.

बॅटरी
OnePlus Nord CE 4 मध्ये 5,500 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 100W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ते केवळ 29 मिनिटांत 1% ते 100 टक्के चार्ज करू शकते.

इतर फिचर्स
OnePlus Nord CE 4 5G फोन IP54 रेट केलेला आहे. या फोनमध्ये USB Type-C 2.0, Bluetooth 5.4 आणि 5GHz ड्युअल-बँड Wi-Fi यांसारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here