6जीबी रॅम वाल्या या दमदार फोन सह परत आला आहे ब्लॅकबेरी

एक काळ होता जेव्हा ब्लॅकबेरी मोबाईल विश्वावर राज्य करत होती. ब्लॅकबेरी स्मार्टफोन म्हणजे स्टेट्स सिम्बल होते. पण सध्या बाजारात एंडरॉयड स्मार्टफोंस चा बोलबाला आहे. दीर्घकाळानंतर आता पुन्हा एकदा ब्लॅकबेरी ने बाजारत पाऊल टाकले आहे. ब्लॅकबेरी ने भारतात नवीन मोबाईल फोन ‘ब्लॅकबेरी की2’ लॉन्च केला आहे. हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून बाजारात आला आहे जो 42,990 रुपयांमध्ये 31 जुलै पासून अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

ब्लॅकबेरी की2 ला भारतात आॅप्टिमस इंफ्राकॉम ने आणले आहे. या फोन मुळे एकीकडे ब्लॅकबेरी पुन्हा मार्केट मध्ये येत आहे तर दुसरीकडे ब्लॅकबेरी फॅन्स साठी पण की2 एक शानदार भेट ठरू शकते. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 1620 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 4.5-इंचाचा फुलएचडी डिस्प्ले आहे, जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. सोबत ब्लॅकबेरी चा आयकॉनिक कीबोर्ड देण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी की2 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 64बिट कोरयो 260 आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या हाईएंड डिवाईस मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम दिला आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ब्लॅकबेरी की2 डुअल रियर कॅमेरा सपोर्टेड आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे 2एक्स झूम ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये इन-कीबोर्ड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. म्हणजे यूजर्स कीबोर्ड ला टच करून फोन आनलॉक करू शकतात.

हा फोन एनएफसी, ओटीजी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. तसेच यूएसबी टाईप सी सोबत फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये यूनिवर्सल शॉर्टकट की पण आहे जी वापरून डायरेक्ट कोणतेही अॅप्लीकेशन किंवा फंक्शन ओपन करता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here