OnePlus Nord सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन्स N10 5G आणि N100 बाबत गेल्या काही दिवसांपासून सतत माहिती समोर येत होती. आज कंपनीने चुपचाप OnePlus Nord N सीरीजचे हे दोन्ही फोन्स जगासमोर ठेवले आहेत. 91mobiles ने आधीच माहिती दिली होती कि कंपनी काल वनप्लस नॉर्ड एन10 5जी आणि एन100 सादर करेल. हे दोन्ही फोन्स सध्या यूरोपियन मार्केट मध्ये सादर केले गेले आहेत. पण इतर देशांमध्ये हे फोन्स लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी लवकरच भारतात हे फोन्स पण सादर करू शकते. पुढे आम्ही या पोस्ट मध्ये Nord N100 फोनची माहिती दिली आहे.
डिजाइन
कंपनीने OnePlus Nord N100 त्या ग्राहकांसाठी डिजाइन केला आहे जे आपल्या डेली यूजसाठी एक चांगला बेस्ट-इन-क्लास स्मार्टफोन शोधत आहेत. फोनची डिजाइन पाहता डिवाइस पंच होल सह सादर केला गेला आहे जो फ्रंट पॅनलच्या टॉप लेफ्टला आहे. तसेच फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. फोनच्या बॉटमला जाड चिन पार्ट आहे. मागे ओवल शेप ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप टॉप लेफ्टला आहे. सोबतच फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर आहे.
स्पेसिफिकेशन्स
वनप्लस नॉर्ड एन100 फोन मध्ये 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसेच फोन मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. या एंट्री-लेवल स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर सीपीयू असलेला स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने फोन मधील सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली नाही. फोन अँड्रॉइड 11 बेस्ड ऑक्सीजन ओएस सह सादर केला गेला आहे. पावर बॅकअपसाठी OnePlus Nord N100 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.
हे देखील वाचा : OnePlus चा नवीन 5G स्मार्टफोन Nord N10 लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी
किंमत
OnePlus Nord N100 कंपनीने सिंगल वेरिएंट आणि एकाच रंगात सादर केला गेला आहे. डिवाइस Midnight Frost कलर ऑप्शन आणि 4GB रॅम व 64GB स्टोरेज सह सादर केला गेला आहे. याची किंमत 179 डॉलर (जवळपास 13,257 रुपये) आहे. हँडसेट सध्या यूरोप मध्ये उपलब्ध होईल आणि विक्री 10 नोव्हेंबर पासून सुरु होईल. उत्तर अमेरिकेतील उपलब्धतेबाबत लवकरच माहिती दिली जाईल. वनप्लस नॉर्ड एन10 5जी आणि वनप्लस नॉर्ड एन100 इंडियाच्या लॉन्च बाबत आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.














