सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीसह येतेय Xiaomi ची इलेक्ट्रिक कार; मिळणार थक्क करणारे फीचर्स

स्मार्टफोन्स आणि स्मार्ट गॅजेट्स बनवण्यासाठी लोकप्रिय असलेली चिनी कंपनी Xiaomi आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एक प्रॉडक्ट जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. कंपनी सध्या 4 डोर इलेक्ट्रिक व्हेईकलची निर्मिती करत आहे. ही इलेक्ट्रिक कार सेल्फ ड्राइव्हिंग फिचरसह साल 2024 जगभरात लाँच केली जाईल. Xiaomi चे सीईओ ली जू यांनी सांगितलं की त्यांची कंपनी लवकरच ऑटोमोटिव्ह स्पेसमध्ये 4-डोर सेडानसह एंट्री करणार आहे. ही इन-हाउस सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाईल.

ही योजना वेग पकडत आहे, कारण कंपनी चीनमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये कार निर्मिती करणार आहे. या कारच्या माध्यमातून Xiaomi ऑटोमोटिव्ह उद्योग क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या OEM च्या विशेष वर्गात समाविष्ट होईल. शाओमीची सेल्फ ड्राइव्हिंग इलेक्ट्रिक कार आपल्याच फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर करण्याची योजना बनवत आहे. तसेच शाओमी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या टॉप क्लास कंपन्यांशी एक्लक्लूसिव पार्टनरशिप देखील करत आहे.

शाओमीच्या इलेक्ट्रिक कारची किंमत

Xiaomi याआधी BAIC सह पार्टनरशिपमध्ये आपल्या व्हेईकलच्या प्रोडक्शनवर काम करण्याची योजना बनवत होती. परंतु दोन्ही कंपन्यांमधील सौदा बारगळला आणि चिनी कंपनी आता स्वतः आपले इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करणार आहे. Xiaomi चा ऑटोमोटिव्ह प्लांट चीनच्या यिजुआंग प्रांतात आहे आणि कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची किंमत जवळपास 150,000 युआन (सुमारे 17,50,000 रुपये) असू शकते. हे देखील वाचा: 5000mAh Battery असलेला Realme चा स्वस्त स्मार्टफोन लाँच; पहिल्याच सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव

Xiaomi Pilot म्हणजे काय

विशेष म्हणजे Xiaomi ची सेल्फ-ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजी असलेली नवीन कार देखील लाँच करेल. सध्या या टेक्नॉलॉजीला Xiaomi Pilot असं नाव देण्यात आलं आहे. ही कार LIDAR वर आधारित आहे आणि यात Xiaomची AT128 हायब्रीड सॉलिड-स्टेट रडार सिस्टम देखील असेल. या कारमध्ये व्यूइंग अँगल आणि अन्य सिक्योरिटी इंप्रूवमेंटसह सुधारित आणि अ‍ॅडव्हान्स सेल्फ ड्राइव्हिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: 16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर

शाओमीची पहिली ईव्ही कार

Xiaomi सध्या आपल्या आगामी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) ची रेंज, टॉप स्पीड आणि अन्य स्पेसिफिकेशन्सबाबत जास्त माहिती देत नाही. तसेच ही इलेक्ट्रिक कार चीननंतर जागतिक बाजारात येण्यासाठी किती वाट पाहावी लागेल, हे देखील स्पष्ट झालं नाही. ईव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे आणि चिनी कंपन्यांमुळे या मार्केटमधील रंगत वाढली आहे. ऑटोनॉमस ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्री जोर पकडण्याची शक्यता आहे. शाओमीनं सध्यातरी आगामी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँचच्या टाइम लाइनबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आशा आहे की कंपनी 2024 मध्ये पहली ईव्ही लाँच करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here