भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

Vivo नं या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Vivo Y35 स्मार्टफोन लाँच केला होता जो 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery सारख्या पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. Vivo Y35 स्मार्टफोन भारतात 18,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच आता ‘वाय’ सीरीज अंतगर्त विवोनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन Vivo Y22 देखील लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये गेमिंग प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

Vivo Y22 Specifications

विवो वाय22 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38 एमएम आणि वजन 180 ग्राम आहे. हे देखील वाचा: Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. फोनअधे 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे रॅम अतिरिक्त 2 जीबी गरजेनुसार वाढवता येतो.

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह बाजारात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Vivo Y22 IPX4/X5 rated फोन आहे. हे देखील वाचा: शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

Vivo Y22 Price

विवो वाय22 सध्या इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जिथे या फोनचे दोन व्हेरिएंट्स कंपनीनं सादर केले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM सह 64GB storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस IDR 2,399,000 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 12,800 रुपये आहे. Vivo Y22 चा मोठा व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB storageला सपोर्ट करतो परंतु कंपनीनं या मॉडेलची किंमत मात्र सांगितली नाही. विवो वाय22 Starlit Blue, Summer Cyan आणि Metaverse Green कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच हा फोन भारतात देखील दाखल होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here