फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला OPPO A11k, बघा संपूर्ण माहिती

91मोबाईल्सने कालच एक्सक्लूसिव बातमी देत माहिती दिली होती कि टेक कंपनी ओपो भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्याची तयारी करत आहे आणि कंपनी येत्या काही दिवसांत तीन नवीन स्मार्टफोन Oppo A11K, Oppo A12 आणि Oppo A52 भारतीय बाजारात लॉन्च करेल. आज यातील एका लो बजेट डिवाईस Oppo A11K ची लॉन्च होण्याआधी किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OPPO A11k भारतात कोणत्या दिवशी लॉन्च केला जाईल हि माहिती अजूनतरी समोर आली नाही पण टिपस्टर इशान अग्रवालने या फोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर शेयर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओपो ए11के स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M01 आणि Moto G8 Power Lite फोन पण या किंमतीत लॉन्च झाले आहेत.

OPPO A11k

ओपो ए11के चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के असेल. फोन डिस्प्ले आय प्रोटेक्शन सोबतच सीजी3 कोटेड असेल.

लीक नुसार OPPO A11k एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल जो कलरओएस 6.1.2 वर चालेल. तसेच हीं प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट मिळणार असल्याचे समोर आले आहे. ओपो ए11के चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

OPPO A11k डुअल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल जो हॉरिजॉन्टल शेप मध्ये असेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर मिळेल. लीकनुसार ओपो चा हा नवीन फोन सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओपो ए11के या लीक मध्ये 4,230एमएएच च्या बॅटरी सह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. लीकनुसार हा फोन Deep Blue आणि Flowing Silver कलर मध्ये बाजारात येईल आणि फोनची किंमत असेल फक्त 8,999 रुपये. OPPO A11k च्या लॉन्च डेटसाठी अजूनतरी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here