200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

BSNL (भारत संचार निगम लिमिटिड) सध्या कमी किंमतीत युजर्सना फायदेशीर ठरणारे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) ऑफर करणाऱ्या टेलीकॉम कंपन्यांनामध्ये सर्वात वर आहे. बीएसएनएलकडे ग्राहकांसाठी असे अनेक Prepaid Plan आहेत जे स्वस्तात दीर्घ वैधतेसह अनेक बेनिफिट्स देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा तीन स्वस्त रिचार्ज प्लॅनची (BSNL cheapest 90 days validity plan) माहिती देणार आहोत, ज्यात कंपनी तुम्हाला खूप कमी किंमतीत 90 दिवसांची वॅलिडिटी देत आहे.

BSNL 90 days validity plan

थक्क करणारी बाब म्हणजे Jio च्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये 90 दिवस वॅलिडिटी असलेला एक रिचार्ज प्लॅन अलीकडेच जोडण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 750 रुपये आहे. परंतु सरकारी कंपनीचे रिचार्ज प्लॅन यापेक्षा स्वस्तात शानदार बेनिफिट्स देत आहेत. पुढे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 90 दिवस वैधता असलेल्या बेस्ट रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा

  • BSNL Rs 201 Recharge Plan
  • BSNL Rs 485 Recharge Plan
  • BSNL Rs 499 Recharge Plan

BSNL का 201 रुपयांचा प्लॅन

या यादीतील सर्वात पहिला प्लॅन 201 रुपयांचा आहे, ज्याचा समावेश आम्ही या लिस्टमध्ये केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये 300 मिनिटांची व्हॉइस कॉलिंग आणि 6GB डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर प्लॅनसह 99 रुपयांचे SMS देखील फ्री मिळतात.

BSNL का 485 रुपयांचा प्लॅन

485 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांच्या वॅलिडिटीसह अनलिमिटिड व्हॉइस कॉलिंग आणि प्रतिदिन 1.5GB डेटा मिळतो. तसेच डेली मिळणार डेटा संपल्यावर इंटरनेट स्पीड 40 Kbps वर कमी केला जातो. डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये युजर्सना प्रतिदिन 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. हे देखील वाचा: BSNL चे 2022 मधील बेस्ट रिचार्ज प्लॅन्स ज्यांच्यामोर Jio-Airtel देखील आहेत फेल

BSNL का 499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांच्या वॅलिडिटीसह अनलिमिटिड कॉलिंग, प्रतिदिन 2 जीबी डेटा आणि डेली 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर इस प्लॅनसह ग्राहकांना Zing सब्सक्रिप्शन देखील मोफत दिलं जातं.

Note: बीएसएनएलच्या प्लॅनचे बेनिफिट्स वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वेगवेगळे असतात. त्यामुळे रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबाबत कंपनीच्या साइट किंवा बीएसएनएल कस्टमर केयर कडून माहिती मिळवता येईल. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here