4,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च झाला OPPO A1k, किंमत फक्त 8,490 रुपये

91मोबाईल्स ने जवळपास तीन आठवड्यांपूर्वी एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि ओपो इंडिया एक स्वस्त स्मार्टफोन वर काम करत आहे​ जो OPPO A1k नावाने लॉन्च केला जाईल. फोनच्या माहिती सोबत सांगण्यात आले होते कि OPPO A1k मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. तसेच आज हा स्मार्टफोन सदर करत ओपो ने आपला नवीन डिवाईस OPPO A1k भारतात लॉन्च केला आहे. OPPO A1k 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो आनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

OPPO A1k चा लुक
OPPO A1k कंपनी द्वारा ‘यू’ शेप ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनचे तीन किनारे बेजल लेस आहेत तर खाली बारीक बॉडी पार्ट असतील. फोनचा सेल्फी कॅमेरा याच नॉच मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे OPPO A1k मध्ये कोणताही फिजिकल फिंगर​प्रिंट सेंसर नाही. वॉल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर तर पावर बटण उजव्या पॅनल वर देण्यात आले आहे. खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.

OPPO A1k चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A1k 19.5:9 आस्पेक्ट रे​शियो वर सादर करण्यात आला आहे जो 87.43 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A1k एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर करण्यात आला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो.

कपंनीने हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A1k सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A1k एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग के ​साठी फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी OPPO A1k कंपनी द्वारा 4,000एमएएच च्या दमदार बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. ओपोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

OPPO A1k च्या इंडिया लॉन्च विषयी ओपो इंडियाचे सीईओ आणि साउथ एशिया प्रेजिडेंट Charles Wong म्हणाले कि, “ओपो आपल्या ग्राहकांना इनोवेटिव आणि कन्ज्यूमर सेंट्रिक प्रोडक्ट देण्यासाठी कटिबद्ध आहे. OPPO A1K च्या माध्यमातून आम्ही मार्केट मध्ये लीड करणारे सर्व स्पेसिफिकेशन्स जसे की मोठी बॅटरी लाईफ, शानदार डिजाईन, वॉटरड्रॉप नॉच आणि पावरफुल परफॉर्मन्स कमी बजेट मध्ये इंडियन स्मार्टफोन यूजर्स साठी सादर केले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here