8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच

Highlights

  • POCO X5 5G ग्लोबली लाँच झाला आहे.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो.
  • पोको एक्स5 मध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 33W चार्जिंग मिळते.

POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच झाला आहे, तर POCO X5 5G नं ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. पोको एक्स5 एक बजेट स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 8GB RAM, 48MP Camera, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battey सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात ज्यांची संपूर्ण माहिती आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

POCO X5 5G Price

पोको एक्स5 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये ग्लोबली लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता 6GB व्हेरिएंट $249 तर 8GB व्हेरिएंट $299 मध्ये आला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 20,500 रुपये तर 24,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black, Green आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone 2 मध्ये मिळणार हटके डिजाइन? स्पेसिफिकेशन आणि भारतीय लाँचची माहिती लीक

POCO X5 5G Specifications

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

पोको एक्स5 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेसह 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देखील मिळतात. तसेच सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

POCO X5 5G फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो, जोडीला एड्रेनो 619जीपीयू आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सिम, एनएफसी व 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये आयआर ब्लास्टर व आयपी53 सारखी टेक्नॉलॉजी मिळते. हे देखील वाचा: भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स व 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here