एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra

Highlights

  • 200MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच
  • फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे
  • 5000mAh च्या दमदार बॅटरीसह फोनची एंट्री

Samsung नं आपल्या एका जबरदस्त लाँच इव्हेंट Galaxy Unpacked 2023 मधून आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन प्रिमीयम स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy S23 5G, Galaxy S23 Plus 5G आणि Galaxy S23 Ultra 5G बाजारात आणले आहेत. यातील अल्ट्रा मॉडेल 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.

Samsung Galaxy S23 Ultra Specifications

  • 6.8 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • एस पेन सपोर्ट
  • 5000mAh ची बॅटरी
  • 200MP क्वॉड कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 12GB RAM आणि 1TB स्टोरेज

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंचाचा क्यूएचडी+ एज डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचरला सपोर्ट करतो. हा फोन एस पेनला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 78.1 X 163.4 X 8.9एमएम आणि वजन 234 ग्राम आहे. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

प्रोसेसिंगसाठी Galaxy S23 Ultra मध्ये क्वॉलकॉमच्या लेटेस्ट Snapdragon 8 Gen 2 चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दमदार फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतो. गेमिंग करताना फोनचं तापमान वाढू नये म्हणून यात व्हेपर चेंबर कुलिंग देण्यात आली आहे.

हा फोन IP68 सर्टिफाइड असल्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते जी 45W फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.7 अपर्चर असलेला 200MP चा प्रायमरी सेन्सर, जोडीला एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा, एफ 2.3 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आणि एफ 4.9. अपर्चर असलेली 10MP ची 10X झूमसह टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचे चार व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच 12GB RAM व 256GB स्टोरेज, 12GB RAM व 512GB स्टोरेज आणि 12GB RAM व 1TB स्टोरेज मॉडेल देखील बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 1,199 डॉलर्स (सुमारे 98,271 रुपये) ठेवण्यात आली आहे. इतर मॉडेल्सची किंमत अद्याप समोर आली नाही. तसेच या स्मार्टफोनची भारतीय किंमत उद्या शेयर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here