OPPO ने आपली A-सीरीज वाढवत OPPO A54 लॉन्च केला आहे. फोन इंडोनेशियामध्ये सादर केला गेला आहे. इतकेच नव्हे तर फोन कंपनीने 4G नेटवर्क सपोर्टसह सादर केला आहे जो अफवांमध्ये असलेल्या 5G मॉडेलपेक्षा खूप वेगळा आहे. काही दिवसांपूर्वी Oppo A54 5G अनेक सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट केला गेला होता. ओपो ए74 फोनबद्दल बोलायचे तर हा फोन बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला गेला आहे. चला एक नजर टाकूया OPPO A54 ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सवर. (oppo a54 4g phone launch with 5000mah battery price specification)
OPPO A54 4G ची डिजाइन
फोनची डिजाइन पाहता फोन होल-पंचसह सादर केला गेला आहे. तसेच डिवाइसच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत आणि बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. तसेच मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकाराचा आहे.
हे देखील वाचा : उद्यापासून मोबाईल विकत घेणे होईल महाग, जाणून घ्या किती करावा लागेल खिसा रिकामा
OPPO A54 चे स्पेसिफिकेशन
ओपो A54 चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.51-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशन (720 x 1600 पिक्सल) आणि 60Hz रिफ्रेश रेट व 89.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योवर चालतो. फोनमध्ये MediaTek Helio P35 SoC आहे जो 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13MP प्राइमरी कॅमेरा सेंसर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP बोके लेंस आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.
फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर व एआय फेस अनलॉक देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड Android 10 बेस्ड Color OS 7.2 वर चालतो. याचे वजन 192 ग्राम व 8.4mm थिक आहे. तसेच फोन IPX4 वॉटरप्रूफ सर्टिफिकेशनसह येतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : रियलमीचा मोठा डाव, 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला शक्तिशाली फोन Realme GT Neo
किंमत
A54 ची किंमत IDR 2,699,000 पासून सुरु होते, जी भारतीय चलनात जवळपास 13,600 रुपये आहे. हि किंमत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. भारतात या फोनच्या लॉन्चची माहिती सध्या समोर आली नाही.















