Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन

नोव्हेंबर 2017 मध्ये Apple ने मोबाईल जगात एक नवीन ट्रेंड सुरु केला होता. यादिवशी iPhone X लॉन्च केला गेला होता जो रुंद ‘नॉच’ डिस्प्लेसह मार्केटमध्ये आला होता. या अ‍ॅप्पल आयफोनची स्टाईल जवळपास सर्व अँड्रॉइड स्मार्टफोस ब्रँड्सने कॉपी केली आणि आपले मोबाईल फोन्स नॉच डिस्प्लेवर लॉन्च केले. गेल्या 4 वर्षांत अँड्रॉइड फोन्स नॉचवरून वॉटरड्रॉप नॉच आणि पंच-होल डिजाईनपर्यंत पोहोचले पण अ‍ॅप्पलचे आयफोन अजूनही रुंद नॉचसह येतात, जे अनेक अ‍ॅप्पल युजर्सना खटकते. आता Apple पण हा ट्रेंड तोडून पुढे जाणार आहे. बातमी मिळाली आहे कि आता अ‍ॅप्पल पण पंच-होल डिस्प्ले असलेले iPhone मार्केटमध्ये लॉन्च करेल. (apple iphone se 2023 with punch hole display third generation will support 5g)

Apple iPhone आता रुंद नॉच डिजाईनच्या पुढे जात पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर शिफ्ट होणार आहेत. हि बातमी अनेक आयफोन लवर्सना खुश करणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा iPhone 12 सीरीजची घोषणा केली जाणार होती, तेव्हा लोकांना अपेक्षा होती कि यावेळी आयफोन्सच्या डिस्प्ले आणि डिजाईनमध्ये बदल झालेला दिसेल, पण असे नाही झाले. परंतु आता Apple iPhone ची स्टाईल बदलणार आहे. कंपनी आपले नवीन आयफोन्स पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या फोन्सचे डिटेल समोर आले आहेत.

Apple iphone 12 mini

iPhone SE पासून होईल पंच-होलची सुरुवात

पंच-होल डिस्प्ले असलेल्या आयफोनची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅप्पलने प्लानिंग केली आहे कि कंपनी आपले नवीन आयफोन्स पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च करेल. असे सांगण्यात आले आहे कि पंच-होल डिस्प्ले असलेल्या आयफोनची सुरुवात कंपनी ‘एसई’ सीरीजपासून करेल आणि iPhone SE 2023 मॉडेलमध्ये पंच-होल स्टाईल मिळेल. लीकनुसार आयफोन एसई 2023 6.1 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल. सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल स्क्रीनवर कुठे दिला जाईल हि माहिती अजूनही स्पष्ट झाली नाही.

हे देखील वाचा : LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण

5Gला सपोर्टसह येईल नवीन iPhone

iPhone 12 सीरीजसह अ‍ॅप्पलने आपल्या मोबाईल फोन्समध्ये 5जी सपोर्ट देण्याची सुरुवात केली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार कंपनी आपल्या कमी किंमतचा ‘एसई’ मॉडेल पण 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह बाजारात घेऊन येईल. लीकनुसार कंपनीचा पुढील iPhone SE Sub-6 GHz स्पीडवर काम करणाऱ्या 5G मॉडेमसह येईल. तसेच या फोनमध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल जो एलसीडी पॅनलवर बनलेला असेल. लीकनुसार हा फोन iPhone SE 2022 मॉडेल असेल.

iPhone 11

इथे आम्ही पुन्हा स्पष्ट करू इच्छितो कि iPhone SE मॉडेल Apple च्या स्वस्त आयफोन कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे जर आयफोन एसईमध्ये एलसीडी पॅनल, पंच-होल डिस्प्ले आणि 5Gला सपोर्ट मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे कंपनीची आगामी आयफोन सीरीज म्हणजे iPhone 13 किंवा iPhone 14 आधीपेक्षा जास्त पावरफुल व स्टाईलिश असू शकते. वरील सर्व माहिती सध्या एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

अ‍ॅप्पल आयफोन 12 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here