OnePlus नं भारतात लाँच केला 50 इंचाचा नवीन स्मार्ट टीव्ही

OnePlus नं गेल्या आठवड्यात आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord 2T 5G सादर केला होता. आता कंपनीनं आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियो वाढवला आहे. OnePlus TV Y सीरीज अंतर्गत OnePlus 50 Y1S Pro स्मार्ट टीव्हीची एंट्री भारतात झाली आहे. कंपनीच्या इकोसिस्टममध्ये हा टीव्ही चपखल बसतो. कंपनीच्या स्मार्टफोन्स आणि स्मार्ट टीव्हीमध्ये सिमलेस कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. 43 इंचाच्या मॉडेलनंतर वनप्लसनं भारतात 50 इंचाचा 4K UHD डिस्प्ले असलेला OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्टटीव्ही सादर केला आहे.

OnePlus 50 Y1S Pro ची किंमत

OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्ट टीव्हीची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. वनप्लसच्या या अँड्रॉइड टीव्हीची विक्री ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India च्या माध्यमातून केली जाईल. कंपनीच्या वेबसाईटवर देखील हा टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध होईल. येत्या 7 जुलैला हा टीव्ही सर्वप्रथम सेलसाठी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध होईल.

वनप्लसच्या या नव्या टीव्हीवर मिळणार ऑफर्स पाहता, Axis बँकेच्या ग्राहकांना 3000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. तसेच हा टीव्ही तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला 9 महिन्यांचा पर्याय निवडावा लागेल. त्याचबरोबर वनप्लसचा हा टीव्ही अ‍ॅमेझॉनवरून विकत घेणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाचं अ‍ॅमेझॉन प्राईम सब्सस्क्रिप्शन मोफत मिळेल.

OnePlus 50 Y1S Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 50 Y1S Pro स्मार्ट टीव्ही बेजल लेस डिस्प्ले डिजाईनसह बाजारात आला आहे. वनप्लसच्या प्रीमियम डिजाइन असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K UHD पॅनल देण्यात आला आहे. तसे यातील गामा इंजिन टेक्नॉलॉजी व्हायब्रन्ट कलर, अल्ट्रा क्लीयर कंटेंट आणि डायनॅमिक कॉन्ट्रास्ट ऑफर करतो. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये फास्ट मूव्हिंग सीनमध्ये स्मूद एक्सपीरियंस देण्यासाठी MEMC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. OnePlus TV 50 Y1S Pro टीव्ही Ultra HD डिस्प्लेसह HDR10+, HDR10 आणि HLG फॉरमॅटला सपोर्ट करतो.

OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्ट टीव्ही Android TV 10.0 आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस OxygenPlay 2.0 वर चालतो. हा युजर्सना फुली इंटीग्रेटेड स्मार्ट टीव्ही एक्सपीरियंस देतो. या टीव्हीमध्ये युजर्स ALLM फीचर्स (ऑटो लो लेटेंसी मोड) इनेबल करू शकतात. OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्ट टीव्हीमध्ये MultiCast आणि Google Duo सपोर्ट देण्यात आला आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी यूनीक किड्स मोडची सोय देखील करण्यात आली आहे.

त्याचबरोबर OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्ट टीव्हीमध्ये Dolby Audio ऑडियो सपोर्ट मिळतो. हा टीव्ही क्रिस्टल क्लीयरिटीसह सराउंड साउंड प्रोव्हाइड करतो. OnePlus TV 50 Y1S Pro स्मार्ट टीव्हीमध्ये दोन फुल रेंजचे स्पिकर देण्यात आले आहेत, ज्यांचा टोटल आउटपुट 24W आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here