ओपो ने नुकताच भारतीय बाजारात आपला पहिला ‘वी’ शेप वाला वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला स्मार्टफोन एफ9 आणि एफ9 प्रो लॉन्च केला आहे जो आपल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन मुळे खुप लोकांना आवडत आहे. आता ओपो अंर्तराष्ट्रीय मंचावर पण आपली स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. ओपो च्या एका नवीन स्मार्टफोन बद्दल लीक समोर आला आहे आणि हा फोन ओपो ए7एक्स असल्याचे बोलले जात आहे.
ओपो ए7एक्स बद्दल स्लॅशलीक ने पोस्ट शेयर केली आहे. ज्यात फोनच्या बॅक पॅनलचा फोटो दाखवण्यात आला आहे. या फोटो वरून समजले आहे की ओपोच्या आगमी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल जो फ्लॅश लाईट ला सपोर्ट करेल. त्याचबरोबर बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटो मध्ये ओपो ए7एक्स पर्पल ग्रेडिएंट आणि पर्पल ब्लॅक कलर मध्ये दाखवण्यात आला आहे जो डायमंड फिनिशिंग वाला आहे याच्या बॅक पॅनल वर पण ग्लास कोटेशन आहे.

लीक नुसार ओपो ए7एक्स बर्याच अंशी ओफो एफ9 सारखा असेल. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये किया 4जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल ज्या सोबत ओपो ए7एक्स मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालेल. बोलले जात आहे की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत कलरओएस सह सादर होईल.
ओपो ए7एक्स च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. आशा आहे की ओपो ए7एक्स चा सेल्फी कॅमेरा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करेल. लीक नुसार ओपो ए7एक्स मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.
हा फोन भारतीय कंरसी नुसार 22,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. आता ए7एक्स वर ओपो च्या आॅफिशियल विधानाची वाट बघितली जात आहे.














