स्वस्त फोन Moto G14 ची लाँच डेट कंफर्म, पाहा स्पेसिफिकेशन्स कसे असतील

Highlights

  • फोन येत्या 1 ऑगस्टला सादर होईल.
  • ह्यात Unisoc T616 प्रोसेसर मिळेल.
  • कंपनीनं फोन IP52 सर्टिफाइड ठेवला आहे.

मोटोरोलानं आपला स्वस्त डिवाइस Moto G14 ची लाँच डेट कंफर्म करण्यात आली आहे. नवीन फोन येत्या 1 ऑगस्टला भारतीय बाजारात येईल. कंपनीनं लाँच डेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून शेयर केली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती आली आहे. चला, जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि अन्य माहिती.

Moto G14 लाँच डेट

मोटरोलाचा नवीन डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. फोनची लाँच डेट 1 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. असं देखील सांगितलं जात आहे की हा 1 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. डिवाइसच्या टीजरमध्ये दिसत आहे की फोन प्रीमियम आणि कलरफुल डिजाइनसह सादर केला जाईल. ह्यात युजर्सना ड्यूलटोन फिनिश कलर मिळेल.

Moto G14 डिजाइन

डिवाइस फ्लॅट पॅनलसह समोर आला आहे. ज्यात पंच होल डिस्प्ले दिसत आहे. बॅक पॅनलवर ड्यूलटोन फिनिश सह ब्लू आणि ब्लॅक कॉन्बिनेशन देण्यात आलं आहे. मागील बाजूस एक कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, त्याचबरोबर मधोमध मोटरोलाची ब्रँडिंग देण्यात आली आहे.

Moto G14 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता हा 6.5 इंचाच्या एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्लेसह लाँच होईल.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्ससाठी ह्यात Unisoc T616 प्रोसेसर मिळेल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये कंपनी 4GB रॅम +128GB स्टोरेज देईल. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळेल ज्याच्या मदतीनं 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. ह्या कॅमेऱ्यासह मॅक्रोव्हिजन, नाइट व्हिजन सारखे अनेक फीचर्स मिळतील.
  • सुरक्षा : सुरक्षेसाठी कंपनीनं फोन IP52 सर्टिफाइड केला आहे, ज्यामूळे फोन पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहतो.
  • बॅटरी : स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीचा दावा आहे की ह्या बॅटरीच्या मदतीनं युजर्सना मोठा बॅटरी बॅकअप मिळेल.
  • ऑडियो : चांगल्या ऑडियोसाठी ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस टेक्नॉलॉजी देखील दिली जाईल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल. पुढे अँड्रॉइड 14 आणि 3 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देखील मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here