OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Highlights

  • OPPO Find N2 Flip ची भारतीय किंमत 89,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे.
  • Find N2 Flip फ्लिपकार्ट आणि ओप्पो स्टोर ऑनलाइनवर विकला जाईल.

OPPO Find N2 Flip काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर करण्यात आला होता. आज कंपनीनं या फ्लिप फोनच्या भारतीय किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार हा फोन 89,999 रुपयांमध्ये ओप्पोच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून विकला जाईल. भारतात आलेला हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल फोन आहे. चला जाणून घेऊया या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO Find N2 Flip ची भारतीय किंमत

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप भारतात 89,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या एकमेव 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. हा फोन फ्लिपकार्टसह ओप्पो इंडिया स्टोरवरून पर्पल आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची विक्री 17 मार्चला सुरु होईल. हे देखील वाचा: Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ 120Hz Display
  • 60Hz Secondary Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 9000+
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 44W 4,300mAh Battery

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यातील प्रायमरी डिस्प्ले 6.8 इंचाचा असून फुलएचडी+ 2520 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच फोन घडी केल्यानंतर एक छोटी स्क्रीन बाहेर दिसते ज्यात 720 × 382 पिक्सल रिजोल्यूशन मिळते. या दोन्ही डिस्प्लेमध्ये कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे जो शानदार आणि शार्प व्हिज्युअल क्वॉलिटी देतो.

OPPO Find N2 Flip च्या प्रायमरी स्क्रीनवर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो तसेच सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्ज रिफ्रेश रेट व 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. मेन स्क्रीन वर 1600निट्स ब्राइटनेस, 403पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. तसेच बाहेरील स्क्रीन देखील 900निट्स ब्राइटनेस व 250पीपीआयला सपोर्ट करते. ओप्पोनं आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट केला आहे.

हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्ससह येतो. यातील एक 7पी आणि दुसरी 5जी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोन लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.0 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4एनएम मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल एआरएम माली-जी710 एमसी10 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8जीबी पर्यंतचा रॅम आणि 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जे LPDDR5 RAM आणि UFS3.1 ROM टेक्नॉलॉजीवर काम करतात. हे देखील वाचा: फक्त 5999 रुपयांमध्ये लाँच झाला Nokia C12, जाणून घ्या फीचर्स

दिसायला स्लीक आणि स्लीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ओप्पोनं शक्तिशाली बॅटरी दिली आहे. ओप्पो फाइंड एन2 फ्लिप 4,300एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 44W SUPERVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा ओप्पो मोबाइल ओटीजी रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे दुसरे डिवायस देखील चार्ज करता येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here