आयफोन 10 पेक्षा महाग आहे हा स्मार्टफोन, 1,33,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला हा फोन बघताच तुम्ही व्हाल फिदा

ओपो ने काल टेक बाजारात आपली ताकद दाखवत स्मार्टफोन जगत नवीन स्थान मिळवले आहे. स्मार्टफोंस च्या डिजाईन आणि लुक ला ओपो ने नवीन पैलू दिला आहे. आता पर्यंत कॅमेरा प्लेसमेंट वर लक्ष दिले जात होते की कॅमेरा हॉरिजॉन्टल आहे वा वर्टिकल वा नॉच च्या आत. त्याचवेळी ओपो ने कॅमेरा सेटअप बद्दल अनोखी डिजाईन सादर केली आहे. ओपो ने फाइंड एक्स स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्यात फ्रंट आणि रियर कॅमेरा फोन च्या बॉडी च्या आत असतात आणि बाहेरून दिसत नाहीत.

ओपो ने पॅरिस मध्ये आयोजित ईवेंट मध्ये ओपो फाइंड एक्स सोबत या फोन चा लँबॉर्गिनी एडिशन पण सादर केला आहे. फाइंड एक्स ची किंमत 999 यूरो म्हणजे जवळपास 79,000 रुपये आहे. तर फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन 1,699 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 1,35,000 रुपये आहे. म्हणजे अॅप्पल आयफोन 10 पेक्षा जास्त.

ओपो ने या स्पेशल एडिशन साठी प्रसिद्ध लक्जरी कार निर्माता कंपनी लँबॉर्गिनी सोबत हाथ मिळवणी केली आहे. या फोन चा बॅक पॅनल कार्बन फाइबर टेक्चर चा बनला आहे ज्यावर लँबॉर्गिनी चा 3डी लोगो लावण्यात आला आहे.

फोन चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.8 टक्के आहे. या फोन मध्ये 6.42 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड पॅनारोमिक आर्क डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल्स ला सपोर्ट् करतो. फोन 3डी ग्लास बॉडी वर बनला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटे​क्टेड आहे.

फोन मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम देण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 512जीबी ची शानदार इंटरनल स्टोरेज आहे. ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630 जीपीयू आहे.

या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग टेक्निक आहे. कंपनी च्या दाव्यानुसार या टेक्निक मुळे ओपो फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन फक्त 35 मिनिटांमध्ये 0 टक्के ते 100 टक्के चार्ज होईल. फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये मोटोराइज्ड स्लाइडर देण्यात आला आहे जो कॅमेरा अॅप ओपन करताच बाहेर येतो. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल आणि एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे.

ओपो फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन एंडरॉयड ओरियो सह कलरओएस 5.1 वर चालतो तसेच फोन मध्ये 4जी सोबत 5जी सपोर्ट पण देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here