स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत काही दिवसांपूर्वी ओपो ने आपला फ्लॅगशिप फोन फाइंड एक्स अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला होता. या फोन मध्ये रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत देण्यात आले आहेत जे कॅमेरा अॅप उघडताच बाहेर येतात आणि फोटो क्लिक करतात. भारतात ओपो ची फॅन फॉलोइंग पाहता ओपो ने आज हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे.
ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत ठेवण्यात आले आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप ओपन होताच फोन बॉडी मधून कॅमेरा सेंसर बाहेर निघतात आणि फोटो कॅप्चर करतात. जोपर्यंत फोटो काढण्याची कमांड दिली जात नाही हे कॅमेरा सेटअप पूर्णपणे अदृश्य असतात. बॉडी च्या आत असल्यामुळे फोन फ्रंट आणि बॅक पॅनल वरून पूर्णपणे स्मूथ आहे म्हणजे यावर कोणताही स्लॉट किंवा सेंसर होल नाही.
ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 92.25 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो.
कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. 4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी ओपो फाइंड एक्स मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कपंनी ने फाइंड एक्स चा लेंबोरगिनी एडिशन पण सादर केला आहे जो सुपर वीओओएसी चार्जिंग टेक्निक सह येतो. या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
किंमत पाहता ओपो फाइंड एक्स 59,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो 30 जुलै पासून फ्लिपकार्ट वर आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तसेच 3 ऑगस्ट पासून देशातील आॅफलाईन चॅनल्स वर उपलब्ध होईल.