ओपो फाइंड एक्स सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लॉन्च च्या आधी समोर आले पावरफुल स्पेसिफिकेशन्स

ओपो ने या आठवड्यात आॅफिशियल केले आहे की कंपनी येणार्‍या 19 जूनला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘फाइंड एक्स’ टेक जगासमोर आणणार आहे. ओपो 19 जूनला पॅरिस मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंट च्या मंचावरून ओपो फाइंड एक्स पहिल्यांदा टेक जगासमोर येईल. ओपो ने फाइंड एक्स च्या फीचर किंवा स्पेसिफिकेशन्स संबधी कोणतीही महिती दिली नाही पण लॉन्च च्या आधी हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे.

ओपो फांइड एक्स चीनी स​र्टिफिकेशन्स साइट टेना ​वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये ओपो फांइड एक्स चे दोन वेरिएंट दाखवण्यात आले आहेत ज्यांचा मॉडेल नंबर पीएएफएम00 त​तसेच पीएएफटी00 आहे. बोलले जात आहे की या दोन्ही पैकी एक वेरिएंट 5एक्स आॅप्टिकल झूम ला सपोर्ट करेल तसेच यात 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक मिळेल. तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये हे फीचर्स नसतील. लिस्टिंग वरून समजले आहे की फोन चे डायमेंशन 156.7 x 74.3 x 9.4एमएम चे असतील आणि याचे वजन 186 ग्राम असेल.

टेना ने ओपो फाइंड एक्स च्या जास्त स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख केला नाही. पण अंदाजा लावला जात आहे की हा फोन डुअल एज कर्व्ड डिसप्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 6.4-इंचाचा एमोलेड डिसप्ले दिला जाऊ शकतो ज्यात वरच्या बाजूला नॉच असेल. सांगितले गेले आहे की ओपो आपल्या या हाईएंड स्मार्टफोन ला ब्लॅक आणि व्हाईट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. या फोन मध्ये 8जीबी रॅम मेमरी दिली जाऊ शकते तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

फाइंड एक्स बद्दल आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये माइक्रोएसडी सपोर्ट सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. तसेच ओपो फाइंड एक्स मध्ये 15 मिनिटांत चार्ज होणारी सुपर फास्ट फ्लॅश चार्ज टेक्निक असलेली 3,645एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी सारखे अत्याधुनिक व एडवांस आॅप्शन्स असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here