डुअल कॅमेरा आणि या वेगळ्या डिजाइन सह येईल Google Pixel 4, कंपनीने केले कंफर्म

सर्च इंजन दिग्गज गूगलच्या Pixel सीरीजच्या नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन Pixel 4 बद्दल पण खूप दिवसांपासून लीक्स समोर येत होते. अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये Pixel 4 चा लुक, डिजाइन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. आता स्वतः गूगल ने पिक्सल 4 चे फोटो शेअर करून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

विशेष म्हणजे गूगलच्या ऑफिशियल अकाउंट @madebygoogle वरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट मध्ये कंपनीने Pixel 4 चे फोटो शेयर केले आहेत, ज्यात फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. यावरून असे स्पष्ट झाले आहे कि पिक्सल 4 डिवाइस मध्ये मागील बाजूस एका चौकोनी कॅमेरा मॉड्यूल सह येईल, ज्यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. आतापर्यंत अशाप्रकारचा सेटअप असलेला इतर कुठलाही पिक्सल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध नाही. सध्या बाजारात उपलब्ध सर्व पिक्सल मॉडल्स मध्ये सिंगल कॅमेरा सेंसर आहे.

तसेच फोनच्या खालच्या बाजूला गूगलची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. जरी फोनचा मागील पॅनल या ट्विट मध्ये नीट दाखवला नसला तरी रियर पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे आहे कि कंपनी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देईल किंवा 3डी फेस अनलॉक मॉड्युल असेल किंवा दोन्ही असतील.

तसेच आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या काहलच्या बाजूला दोन एक्सटर्नल स्पीकर्स असतील ज्याच्या मध्ये यूएसबी-सी पोर्ट असेल. Google ने टेक बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम Android Q सादर केली आहे. गूगल आपला Pixel डिवाईसे लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह बाजारात आणते. त्यामुळे कंपनी द्वारा लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन Pixel 4 मध्ये पण एंडरॉयडच्या सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here