BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा

BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) च्या भारतीय पुनरागमनाच्या तयारीला वेग आला आहे. भारत सरकारनं या गेमववर यावर्षी जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. बॅननंतर हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. क्राफ्टननुसार ते भारत सरकार सोबत बोलणी करून गेमच्या रीलाँचसाठी काम करत आहे. बीजीएमआय गेमवरील बंदी हटवण्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु काही गेमिंग कंटेंट क्रिएटर्सनी दावा केला आहे की हे गेम Google Play Store वर पुढील महिन्यात उपलब्ध होऊ शकतो. AFKGaming च्या प्रतीक “Alpha Clasher” जोगिया आणि सोहेल “Hector” शेख यांनी दावा केला आहे की BGMI लवकरच अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करू शकतो.

बीजीएमआय प्लेयर Alpha Clasher नं अजून एक प्लेयर Predatorsasuke सोबत मिळून एक लाइव्ह स्ट्रीम केलं होतं. या लाइव्हस्ट्रीममध्ये दावा करण्यात आला आहे की ते Google च्या माध्यमातून BGMI गेमच्या इंडिया रिलाँचची डेट देखील शेयर केली आहे. त्यांनी या लाइव्ह स्ट्रीममध्ये म्हटलं आहे की BGMI गेम 15 जानेवारीला Google Play Store वर परत येत आहे. हे देखील वाचा: थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; या प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

bgmi

BGMI चं भारतात पुनरागमन

या लाइव्ह स्ट्रीम नंतर Hector नं आपल्या स्ट्रीममध्ये BGMI च्या पुनरागमन बाबत म्हटलं की हा गेम गुगलवर जानेवारीमध्ये रिलाँच होऊ शकतो. त्याने पुढे म्हटलं की ही माहिती त्याला स्वतःला थेट मिळाली नाही परंतु त्याला याबाबत गुगलमध्ये एका टॉप पोजिशनमध्ये काम करणाऱ्या तरुणाकडून गेमच्या भारतातील पुनरागमनाची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीनं सांगितलं की गेमचे पुनरागमन 15 जानेवारीला होऊ शकते. Hector नं पुढे सांगितलं की कंपनी या गेमच्या रिलाँच पूर्वी दोन आठवड्यांपूर्वी टीज करण्यास सुरुवात करेल.

BGMI च्या भारतातील पुनरागमनाबद्दल क्राफ्टन किंवा गुगलनं कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे BGMI च्या या बातमीवर डोळे बंद करून विश्वास ठेवता येणार नाही. याआधी इंडियन गेमिंग कंपनी Skyesports चे CEO शिव नंदी यांनी BGMI आणि TikTok च्या इंडिया रिलाँच बद्दल दावा केला आहे की हे दोन अ‍ॅप 2023 मध्ये भारतात पुनरागमन करू शकतात. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

MeitY अंतर्गत ऑनलाइन गेमिंग

गेले अनेक वर्ष ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन करण्यासाठी इंडस्ट्री केंद्रीय स्तरावरील कायद्याची मागणी करत आहे. यंदा मे मध्ये MeitY नं ऑनलाइन गेमिंगच्या नियमनासाठी प्रस्ताव तयार केला आणि मंत्रालयाची टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्सनं ऑक्टोबरमध्ये केंद्रीय नोडल एजेंसीच्या निर्मितीची शिफारस केली होती. तसेच सांगितलं की ऑनलाइन गेमिंगमध्ये कोणत्या गेम्सचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here