Nokia C01 Plus चा बेस मॉडेल 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट; मिळतोय बँक डिस्काउंट

Nokia ब्रँडची मालकी सध्या एचएमडी ग्लोबलकडे आहे, कंपनी किंमतीला शोभेल असे स्पेसिफिकेशन्स देत नाही. परंतु नोकियाची मजबुती मात्र अजूनही कायम असल्याचं दिसतं. नोकियाच्या भारतीय फॅन्ससाठी कंपनीनं गेल्यावर्षी मार्चमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता. HMD Global नं अत्यंत स्वस्तात लाँच केलेला Nokia C01 Plus स्मार्टफोन आता लाँच प्राइस पेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे.

Nokia C01 Plus वरील ऑफर

नोकिया सी01 प्लस स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या 2 जीबी रॅम व 16 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची एमआरपी 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु सध्या हा फोन 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच जर तुमच्याकडे एचएसबीसी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांची सूट सहज मिळेल. त्यामुळे हा नोकिया फोन फक्त 5,095 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच Nokia C01 Plus स्मार्टफोन एक्सचेंज आणि ईएमआय ऑफर देखील उपलब्ध आहेत. हे देखील वाचा: हे Bollywood चे चित्रपट लवकरच येणार OTT वर; घर बसल्या मिळणार एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…

Nokia C01 Plus चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी01 प्लस कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना बेजल्स देण्यात आले आहेत, तर वर आणि खालच्या बाजूला रुंद चीन पार्ट आहे. वरच्या बाजूला स्पिकर, सेल्फी कॅमेरा व सेन्सर देण्यात आलेत तर खालच्या बाजूला Nokia लिहण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 18:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 295पीपीआय तसेच 720 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची रुंदी 71.8एमएम, जाडी 9.3एमएम तसेच वजन 157 ग्राम आहे.

Nokia C01 Plus अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आला जो Android 11 Go Edition वर चालतो. ‘गो’ एडिशन असल्यामुळे फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅम व स्टोरेजचा वापर करतात, तसेच बॅटरी व इंटरनेट डेटाचा वापर कमी करतात. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 16 जीबी व 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी बजेटमध्ये Samsung चा शानदार 5G Phone हवा? पुढील आठवड्यात येतोय Galaxy A23 5G

फोटोग्राफीसाठी Nokia C01 Plus च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 2 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो जो एलईडी फ्लॅशसह येतो. 3.5एमएम जॅकसह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लस मध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here