लॉन्च च्या आधी समोर आली ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट, 6.4-इंचाच्या नॉच डिसप्ले सह असेल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट

ओपो पुढील आठवड्यात 19 जूनला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘फाइंड एक्स’ टेक जगासमोर आणणार आहे. ओपो 19 जूनला पॅरिस मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून ओपो फाइंड एक्स पहिल्यांदा टेक जगात येईल. ओपो चा हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना ​वर लिस्ट झाला होता तर या फोन बद्दल अजुन एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात फोन चे फुल स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत.

ट्वीट मधून एका टिप्सटर ने ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट शेयर केली आहे ज्यात फोन चे सर्व स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत. या शीट वरून समजते आहे की ओपो फाइंड एक्स 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4 इंचाच्या मोठया डिस्प्ले सह सादर केला जाईल. ओपो द्वारा समोर आलेल्या फाइंड एक्स च्या टीजर मध्ये हे आधीच स्पष्ट झाले आहे की कंपनी हा फोन फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करेल. शीट के नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 वर सादर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

ओपो फाइंड एक्स मध्ये या शीट नुसार 8जीबी रॅम सांगण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेले एफ/2.0 अपर्चर वाले 20 मेगापिक्सल आणि 16 मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर मिळतील तर फोन च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वालाच 25 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

फाइंड एक्स मध्ये ओपो कडून डुअल नॅनो सिम सपोर्ट दिला जाईल तसेच दोन्ही सिम स्लॉट 4जी नेटवर्क वर चालतील. बेसिक कनेक्टिविटी सपोर्ट सह फोन मध्ये ओटीजी व एनएफसी सपोर्ट पण मिळेल. अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. शीट नुसार ओपो या फोनला ग्लेशियल ब्लू आणि रेड कलर मध्ये सादर करेल. बोलले जात आहे की ओपो फांइड एक्स चे दोन वेरिएंट लॉन्च केले जातील ज्यातील एक वेरिएंट 5एक्स आॅप्टिकल झूम ला सपोर्ट करेल तसेच यात 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक मिळू शकते. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि भारत लॉन्च साठी 19 जून च्या फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here