Oppo K12 च्या लाँच पूर्वीच फोटो झाला लीक, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन आले समोर

Oppo K12 च्या लाँच पूर्वीच फोटो झाला लीक, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन आले समोर

ओप्पो आपल्या K-सीरिज अंतर्गत नवीन मोबाईल Oppo K12 लाँच करू शकतो. सांगण्यात आले आहे की स्मार्टफोनची एंट्री पुढच्या आठवड्यात होम मार्केट चीनमध्ये केली जाऊ शकते. परंतु अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, याआधी ही डिव्हाईसचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात डिझाईन दिसत आहे. तसेच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर याचे प्रमुख स्पेसिफिकेशन पाहायला मिळाले आहेत. चला, पुढे दोन्हीची माहिती सविस्तार जाणून घेऊया.

Oppo K12 ची डिझाईन

 • Oppo K12 बद्दल नवीन माहिती मायक्रो ब्लॉग्गिंग प्लॅटफॉर्म वीबोवर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केली आहे.
 • तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की नवीन मोबाईल Oppo K12 पूर्व मध्ये लाँच केला गेलेल्या OnePlus Nord CE 4 प्रमाणे वाटत आहे.
 • फोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश लावण्यात आला आहे. तर खालच्या बाजूला ओप्पोचा लोगो लावण्यात आला आहे.
 • Oppo K12 ला ग्रीन कलर ऑप्शनमध्ये शेअर करण्यात आले आहे ज्याच्या लाँचच्या वेळी इतर मार्केटिंग नावाने आणले जाऊ शकते.
 • अपेक्षा आहे की नवीन ओप्पो फोनला OnePlus Nord CE 4 च्या रिब्रँड व्हर्जनच्या रूपामध्ये आणले जाईल.

Oppo K12 गीकबेंच लिस्टिंग

 • ओप्पोची नवीन K-सीरिज मोबाईल गीकबेंच डेटाबेसवर PJR110 मॉडेल नंबरसह स्पॉट करण्यात आली आहे.
 • Oppo K12 स्मार्टफोनने सिंगल-कोरमध्ये 1134 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2975 स्कोर केला आहे.
 • लिस्टिंगमध्ये ऑक्टा-कोर चिपसेटचा कोडनेम “क्रो” आहे, ज्याला एड्रेनो 720 जीपीयू सह जोडले गेले आहे. ही क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट असू शकते.
 • तुम्ही लिस्टिंग फोटोमध्ये पाहू शकता की ओप्पो के12 मध्ये 10.99 जीबी म्हणजे एकूण 12GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकते.
 • ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोबाईल Android 14 वर आधारित ColorOS 14 वर काम करू शकतो.

Oppo K12 स्पेसिफिकेशन (संभाव्य)

 • डिस्प्ले: रिपोर्ट्सनुसार ओप्पो के 12 मोबाईलमध्ये 6.74-इंचाचा अ‍ॅमोलेड पॅनल मिळू शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
 • स्टोरेज: हा फोन 12GB पर्यंत LPDDR4x रॅम+ 512GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज प्रदान करू शकतो.
 • कॅमेरा: Oppo K12 मध्ये समोरच्या बाजूला सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तर रिअर पॅनलवर ऑप्टिकल फोटो स्टेबिलाइजेशन टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड लेन्स लावला जाऊ शकतो.
 • बॅटरी: डिव्हाईसला पावर देण्यासाठी 5,500mAh ची मोठी बॅटरी आणि याला लवकर चार्ज करण्यासाठी 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
 • इतर: फोनमध्ये ड्युअल सिम 5 जी, ड्युअल स्टीरियो स्पिकर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयआर ब्लास्टर सारखे फिचर्स मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here