OPPO K12x स्मार्टफोन झाला चीनमध्ये लॉच, यामध्ये आहे 80W चार्जिंग, 5500mAh बॅटरी आणि 12GB RAM

ओप्पोने आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन ‘के’ सीरिज स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीकडून OPPO K12x लाँच करण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाईल 12GB RAM, Qualcom Snapdragon 695 प्रोसेसर तसेच 80W फास्ट चार्जिंग सारख्या स्पेसिफिकेशनसह आला आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K12x चे स्पेसिफिकेशन

  • 6.67″ 120 हर्ट्झ ओएलईडी स्क्रीन
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट
  • 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
  • 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 5,500 एमएएच बॅटरी
  • 80 वॉट फास्ट चार्जिंग

स्क्रीन : OPPO K12x मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणारा 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले OLED पॅनलवर बनला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेट तसेच 1200nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोनला In-display फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहे.

प्रोसेसर : ओप्पो के12 एक्स स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो कलर ओएस 14 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2GHz क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 619 GPU आहे.

मेमरी : चीनमध्ये हा नवीन ओप्पो मोबाईल 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच करण्यात आला आहे जो 256GB तसेच 512GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1TB पर्यंतचे मेमरी कार्ड पण लावले जाऊ शकते. ओप्पो के12 एक्स LPDDR4x RAM + UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणाऱ्या 2MP depth सेन्सरसह मिळून चालतो. OPPO K12x 16MP Selfie Camera ला सपोर्ट करतो जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी ओप्पो के12 एक्स स्मार्टफोनमध्ये 5,500mAh battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी कंपनीने आपल्या नवीन मोबाईल फोनला 80W SuperVOOC टेक्नॉलॉजीसह बाजारात आणले आहे.

OPPO K12x ची किंमत

चीनमध्ये हा ओप्पो मोबाईल तीन व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल. याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे ज्याची किंमत 1299 yuan म्हणजे 14,990 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचे 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट 1499 yuan (जवळपास 17,190 रुपये) मध्ये तसेच सर्वात मोठा 12GB + 512GB व्हेरिएंट 1799 yuan म्हणजे जवळपास 20,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. ओप्पो के 12 एक्स Green आणि Grey कलरमध्ये आणला जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here