How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय

आधार कार्ड सध्या भारतीयांसाठी सर्वाधिक महत्वाचं ओळखपत्र आहे. आजच्या घडीला फक्त सरकारी नव्हे तर बिगर सरकारी कामांसाठी देखील आधार कार्डची विचारणा केली जाते. बँक अकाऊंट सुरु करायचं असो किंवा नवीन फोन कनेक्शन घ्यायचं असो. इतकंच काय तर मुलांचा शाळेत प्रवेश देखील आधार कार्डविना होत नाही. Aadhaar card सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड फक्त एक ओळखपत्र नाही तर यात आधार कार्ड धारकाची बायोमॅट्रिक माहिती देखील असते. परंतु आयडी प्रूफ म्हणून देत असलेलं आधार कार्ड नकली निघालं तर? अशावेळी तुमचं काम अडकून राहू शकतं. पुढे आम्ही अशी पद्धत सांगितली आहे जिचा वापर करून तुम्ही कोणाचाही आधार कार्ड असली आहे की नकली ते व्हेरिफाय करू शकता.

आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफाय करण्याची पद्धत सांगणार आहोत. हे काम सरकारी वेबसाइटवर सहज करता येतं. यामुळे तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करून फसवणुकीपासून वाचू शकता. आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या वेबसाइट किंवा mAadhaar अ‍ॅपचा वापर करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगत आहोत. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

वेबसाइटद्वारे आधार कसं व्हेरिफाय करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या फोन किंवा कंप्यूटरच्या ब्राउजरवर UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in ओपन करा.

स्टेप 2: इथे तुमचा आधार नंबर टाकून लॉगइन करा. त्यानंतर खाली स्क्रोल करून Verify Aadhaar वर क्लिक करा.

स्टेप 3: पुढील पेजवर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफाय आधार वर क्लिक करा.

स्टेप 4: आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित माहिती दिली जाईल, ज्यात वय आणि पत्ता असेल.

मोबाइल अ‍ॅप मधून आधार व्हेरिफाय करा

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar अ‍ॅप इंस्टॉल करा.

स्टेप 2: अ‍ॅप मध्ये लॉगइन करून होम स्क्रीनवर Verify Aadhaar वर टॅप करा.

स्टेप 3: ज्या व्यक्तीचा आधार व्हेरिफाय करायचं आहे तिचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि व्हेरिफायवर क्लिक करा.

स्टेप 4: अगले पेजवर तुम्हाला आधार कार्डची माहिती दिसेल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह भारतातील पहिला फोन; iQOO 11 मुळे वनप्लसच्या साम्रज्याला धोका?

आधार कार्ड व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला टाकलेला आधार नंबर अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळेल. यात नाव व्हेरिफाय होत नाही परंतु वर, लिंग आणि पत्तापता व्हेरिफाय करता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here