Exclusive : Xiaomi Realme नंतर आता OPPO पण घेऊन येत आहे फाइनॅन्शियल सर्विस ऍप, Oppo Kash असेल नाव

गेल्या वर्षीच्या शेवटी मोबाईल ब्रँड Realme ने इंडियन यूजर्सना फाइनॅन्शियल सर्विसची सुविधा देत PaySa लॉन्च केला होता. रियलमीने लॉन्च केलेल्या या सर्विसला Xiaomi च्या फाइनॅन्शियल सर्विस Mi Credit चे प्रतिस्पर्धी म्हणण्यात आले होते. शाओमी आणि रियलमी नंतर आता यात अजून एक नवीन नाव OPPO चे जोडले जाणार आहे. टेक कंपनी ओपो पण लवकरच भारतात आपली फाइनॅन्शियल सर्विस सादर करणार आहे आणि या सर्विसचे नाव असेल Oppo Kash. ओपोकॅशने हि कंपनी फक्त आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देणार नाही तर सोबतच स्मार्टफोन यूजर्सना पण नवीन फोन विकत घेण्याआधी पैश्यांची चिंता करावी लागणार नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओपो कंपनी Oppo Kash वर काम करत आहे आणि लवकरच हा ऍप बाजारात रोलआउट केला जाईल. साहजिकपणे Oppo हि सर्विस आधी बीटा वर्जन वर आणेल आणि काही दिवसांनी हि सर्विस Oppo च्या सर्व स्मार्टफोन वर उपलब्द होईल. प्राप्त माहितीनुसार Oppo Kash सध्या टेस्टिंग स्टेज वर आहे आणि ऍप अश्याप्रकारे बनवण्यात आला आहे कि कोणत्याही रेंजच्या स्मार्टफोन वर हा लॅग-फ्री तसेच बग-फ्री चालू शकेल.

Oppo Kash ची निर्मिती पण FinShell करत आहे. विशेष म्हणजे Realme PaySa पण फिंशेल इंडिया द्वारे नियंत्रित केली जाते. ओपोकॅश बद्दल बोलायचे तर हा फाइनॅन्शियल ऍप ओपोच्या लो बजेट एंट्री लेवल स्मार्टफोन पासून हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये पण चालेल. माहितीनुसार Oppo Kash ब्रँडच्या स्मार्टफोन्स मध्ये प्री-लोडेड पण दिला जाऊ शकतो तसेच हा प्लेस्टोर वर पण उपलब्ध होईल. Oppo Kash ओपोच्या लेटेस्ट कलरओएस 7 सह जुन्या वर्जन वर पण चालेल.

हे फीचर्स असतील खास

Oppo Kash रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारा जारी निर्देशांतर्गत बनवण्यात आला आहे. तसेच ओपोकॅश UPI इंटिग्रेडेड पण असेल. यूपीआई चा वापर किती केला जाईल किंवा कुठे मर्यादित केला जाईल हे Oppo Kash बाजारात आल्यानंतरच स्पष्ट होईल. Oppo Kash च्या माध्यमातून कंपनी ओपो स्मार्टफोन्स ईएमआई वर सेलसाठी उपलब्ध करेल सोबतच Oppo फॅन्स ओपोकॅशच्या माध्यमातून आपला स्मार्टफोन तसेच अन्य प्रोडक्ट्ससाठी कंपनी कडून फाइनॅन्स मिळवू शकतील. साध्य शब्दांत सांगायचे तर Oppo Kash च्या माध्यमातून कोणतीही रक्कम न देता नवीन Oppo फोन विकत घेता येईल.

मिळालेल्या माहिती नुसार Oppo Kash च्या माध्यमातून कंपनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लेटफॉर्म वर आपली सर्विस उपलब्ध करेल. छोट्या शहरांपर्यंत ओपोकॅश पोहचवण्यासाठी कंपनी रिटेलर्सना पण ट्रेनिंग देईल. Oppo Kash बद्दल कंपनी कडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आशा आहे कि वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Oppo आपली हि नवीन सर्विस Oppo Kash भारतात लॉन्च करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here