Exclusive: OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z चे स्पेसिफिकेशन्स आले समोर

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO या आठवड्यात 28 ऑगस्टला भारतात आपली Reno 2 सीरीज सादर करण्यासाठी तयार आहे. या सीरीज मध्ये कंपनी OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF नावाचे तीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. 91मोबाईल्स ने Reno 2Z च्या रियल ईमेज आणि फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची सूचना तुम्हाला दिली होती. आता आम्हाला OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

OPPO 2F स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 2F चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन नवीन Reno 2 सीरीज मध्ये येणारा वाला सर्वात अफोर्डेबल फोन असेल. या फोन मध्ये 6.53-इंचाच्या एमोलेड स्क्रीन सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 19:9 आस्पेक्ट रेश्यो, फुल एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सल) रेज्योल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असेल. तसेच फोन मध्ये दिला जाणारा डिस्प्ले Eye प्रोटेक्शन मोड सह येईल. स्मार्टफोन MediaTek Helio P70 प्रोसेसर सह 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येईल.

फोटोग्राफी साठी OPPO Reno 2F मध्ये क्वार्ड-कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48-मेगापिक्सल सॅमसंग ब्राइट जीएम1 सेंसर इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सह दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलची 119-डिग्री अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि दोन 2-मेगापिक्सल सेंसर असेल. हा सेंसर एक्सक्लूसिव डिजाइन फिल्टर्स सपोर्ट सह येईल. तसेच कॅमेरा 10x डिजिटल झूम सह येईल. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मॉड्यूल कॅमेरा असेल.

OPPO Reno 2 चे नवीन डिटेल्स

Reno 2 चे नवीन डिटेल्स समोर आले आहेत. स्मार्टफोन मधील कॅमेरा 2x हाइब्रिड झूम, मार्को शॉट, वीडियो झूम आणि दोन नवीन डिजाइन फिलटर्स असतील. याआधी अधिकृत माहिती समोर आली आहे कि Reno 2 म्हणजे इनोवेशन आणि शानदार यूजर एक्सपीरियंस असेल. Oppo Reno 2 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.1 टक्के असेल. ओपो रेनो 2 मध्ये फुलस्क्रीन बॉर्डर लेस 6.55-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. कंपनीने डिस्प्ले रेज्ल्यूशनची माहिती तर दिली नाही पण स्पष्टपणे सांगितले कि Oppo Reno 2 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल.

कंपनीने सांगितले आहे कि Oppo Reno 2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला जाईल तर फोनचा बॅक पॅनल 3डी कर्व्ड ग्लास वर बनलेला असेल तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला जाईल. Oppo नुसार रेनो सीरीजचा हा आगामी डिवाईस 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला जाईल जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच कंपनीने खुलासा केला आहे कि Oppo Reno 2 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट दिला जाईल

OPPO Reno 2Z चे नवीन फीचर्स

शेवटी या सीरीज मध्ये OPPO Reno 2Z सादर केला जाईल. आमच्या सोर्स नुसार या फोन मध्ये 10x डिजिटल झूम, इलेक्ट्रॉनिक कॅमेरा स्टेबलाइजेशन, अल्ट्रा डार्क मोड, मीडिया ब्लर आणि दोन एक्सक्लूसिव डिजाइन फिल्टर्स असतील. त्याचबरोबर डिस्प्ले रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर Helio P90 प्रोसेसर सह 2.2GHz वर आधारित असेल फोनचे वजन 195 ग्राम असेल.

लीक पाहता Oppo Reno 2Z 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. हा मॉडेल पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. लीक नुसार Oppo Reno 2Z 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वर लॉन्च केला जाईल जो मीडियाटेक हेलीयो पी90 चिपसेट वर चालेल. लीकनुसार हा फोन VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल आणि Oppo Reno 2Z मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here