4 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 8जीबी रॅम असलेला ओपो आर17 प्रो

ओपो ने या आठवड्यात आपल्या आॅफिशियल इंडियन ट्वीटर हँडल वर एक पोस्ट शेयर करत सांगितले होते कि कंपनी इंटरनेशनल मार्केट मध्ये हिट झालेली कंपनीची ‘आर स्मार्टफोन सीरीज’ भारतात आणणार आहे. ओपो इंडिया ने आज मीडिया इन्वाईट पाठवत या दमदार स्मार्टफोन सीरीजची लॉन्च डेट समोर आणली आहे. ओपो ने मीडिया इन्वाईट मध्ये सांगितले आहे कि ओपोच्या आर स्मार्टफोन सीरीजची सुरवात भारतात आपल्या पावरफुल स्मार्टफोन आर17 प्रो सह करेल.

मिळालेल्या माहितीनुसार ओपो डिसेंबरच्या 4 तारखेला मुंबईत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ओपो आर सीरीज भारतीय टेक बाजारात येईल. 4 डिसेंबरला ओपो इंडिया द्वारा लॉन्च केला जाणारा स्मार्टफोन ओपो आर17 प्रो असेल. ओपो ने अजून आर17 प्रो कोणत्या किंमतीती लॉन्च केला जाईल आणि कधी सेल साठी उपलब्ध होईल हे सांगितले नाही. ओपो आर17 प्रो ची खरी किंमत व याची उपलब्धता यासाठी 4 डिसेंबरची वाट बघावी लागेल.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

OPPO R17 Pro

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

ओपो आर17 प्रो 4जी फोन आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग सपोर्ट वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो आर17 प्रो पर्पल आणि ब्लू ग्रेडिएंट रंगांत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपो आर17 चीन मध्ये 4,299 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये होतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here