Oppo ने आज अनेक दिवसांनंतर टेक मंचावर आपली Oppo Reno 2 सीरीज सादर केली आहे. या सीरीजची सुरवात भारतापासून झाली आहे आणि कंपनीने भारतात एक साथ तीन नवीन रेनो फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Oppo Reno 2 सोबत Oppo Reno 2Z आणि Reno 2F स्मार्टफोन पण बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन पावरफुल रॅम, दमदार बॅटरी आणि शानदार क्वॉड रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च झाले आहेत. चला एक नजर टाकूया या दोन्ही स्मार्टफोन्सच्या माहिती वर :
OPPO Reno 2Z
Oppo Reno 2Z कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याच्या फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2Z इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.
Oppo Reno 2Z कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी90 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2Z भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे जो 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX586 सेंसरला सपोर्ट करतो.
Oppo Reno 2Z च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2Z डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 5.0 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
OPPO Reno 2F
Oppo Reno 2F कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2F इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो, ज्यात स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.
Oppo Reno 2F कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी70 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48-मेगापिक्सलचा Samsung GM1 सेंसर आहे.
Oppo Reno 2F च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2F डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 4.2 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत व कलर
Oppo Reno 2Z ने 29,990 रुपयांमध्ये बाजारात प्रवेश केला आहे आणि हा स्मार्टफोन को 6 सप्टेंबर पासून स्काई व्हाईट, ल्यूमिनस ब्लॅक व पोलर लाईट कलर मध्ये विकत घेता येईल. Oppo ने Oppo Reno 2F स्काई व्हाईट आणि लेक ग्रीन कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. कंपनीने अजूनतरी या फोनची किंमत सांगितली नाही तसेच Reno 2F नोव्हेंबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
















