Exclusive: 13MP आणि 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह येईल Samsung Galaxy A11

Samsung आपल्या A सीरीज मध्ये बजेट कॅटेगरी मध्ये Galaxy A11 लवकरच सादर करू शकते. गेल्यावर्षीच्या शेवटापासून फोन बद्दल अनेक लीक व बातम्या समोर येत आहेत. आशा आहे कि यावर्षी कंपनी लवकरच गॅलेक्सी ए11 सादर करू शकते. तसेच सॅमसंगने या सीरीज मध्ये आतापर्यंत Galaxy A71 आणि Galaxy A51 जोडले आहेत. 91मोबाईल्सने Ishan Agarwal सह मिळून Galaxy A11 च्या स्पेसिफिकेशन्सची एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे.

याआधी फोनच्या स्टोरेज आणि डिजाइनची माहिती समोर आलेली आहे. गॅलेक्सी ए11 एंड्रॉयड 10 वर आधारित वन यूआई सह येईल. असे देखील बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा असेल. पण दुसऱ्या दोन सेंसर्स बद्दल माहिती मिळालेली नाही. तसेच Galaxy A11 च्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेंसर असेल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार फोन मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल.

काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सला Samsung Galaxy A11 च्या बॅक पॅनलचा एक्सक्लूसिव फोटो मिळाला होता. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता जो मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मधील होता. या पॅनल मुळे खुलासा झाला होता कि सॅमसंग गॅलेक्सी ए11 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे तसेच तिन्ही सेंसर एकाच रांगेत आहेत.

त्याचबरोबर Samsung Galaxy A11 च्या के बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दिसला होता. फोटो मध्ये हा फोन पालिकार्बोनेट बॉडी वर बनलेला दिसत आहे. तसेच अजून एका लीकने गॅलेक्सी ए11 मध्ये होल-पंच डिस्प्ले असल्याचा दावा पण केला आहे. यूएस एफसीसी लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि Samsung Galaxy A11 मध्ये 4,000 एमएएच क्षमता असलेली बॅटरी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here