OPPO Reno8 T 5G च्या ऑफिशियल टीजरमधून समोर आला फोनचा लूक

Highlights

  • OPPO Reno 8T 5G फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो.
  • लाँचपूर्वीच या ओप्पो मोबाइलचा ऑफिशियल टीजर पोस्टर समोर आला आहे.
  • रेनो 8टी 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओप्पो कंपनी भारतात आपल्या ‘रेनो’ सीरीजचा विस्तार करू शकते. या सीरिजमध्ये कंपनी Reno 8T 5G नावाचा नवीन हँडसेट सादर करू शकते. कंपनीनं अद्याप ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु काही लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ओप्पो रेनो 8टी 5जी फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. परंतु लाँचपूर्वीच 91मोबाइल्सला या फोनचा ऑफिशियल टीजर पोस्टर मिळाला आहे. आम्हाला हा पोस्टर ऑफलाइन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाला आहे. ही पोस्टर ईमेज पुढील काही दिवसांमध्ये कंपनी फोन प्रोमोशनसाठी वापरू शकते. या फोटोमध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत, ज्यातून OPPO Reno 8T 5G च्या लुक व डिजाईनचा देखील खुलासा झाला आहे.

कशी असेल OPPO Reno 8T 5G ची डिजाईन?

पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की ओप्पो रेनो 8टी 5जी फोनमध्ये पंच-होल डिस्प्ले असू शकते. विशेष म्हणजे फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले बेजल लेस एजसह दिला जाऊ शकतो. सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल बॉडी एजपासून थोडा दूर ठेवला जाऊ शकतो. फोनच्या उजवीकडे पॅनलवर पावर बटन आणि डावीकडे वॉल्यूम रॉकर असू शकतो. रियर पॅनल पाहता एक मॉडेल Black कलरचा दाखवण्यात आला आहे तर दुसरा मॉडेल Orange कलरसह येऊ शकतो.

OPPO Reno 8T 5G India Launch Date

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की ओप्पो रेनो 8टी 5जी फोन पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारतात लाँच केला जाऊ शकतो.

OPPO Reno 8T चे संभाव्य स्पेसिफिकेशन

  • 6.43 FHD+ 90Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 695
  • 100MP Rear + 32MP Selfie Camera
  • 67W fast charging

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आतापर्यंत लीक्स व सर्टिफिकेशन्सच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानुसार हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट मिडबजेट 5जी फोन्ससाठी बेस्ट म्हटला जातो. तसेच भारतीय बाजारात रेनो 8टी 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो वचुर्अल एक्सटेंडेड रॅमला पण सपोर्ट करू शकतो.

OPPO Reno 8T मध्ये 100 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलची लेन्स दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. रेनो 8टी 5जी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here