6जीबी रॅम आणि 4025एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला क्वॉड कॅमेरा असलेला OPPO Reno3 A

OPPO ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन Reno3 A लॉन्च केला आहे. रेनो 3 सीरीज मध्ये सादर झालेला हा डिवाईस सध्या जापान मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर मार्केट्स मध्ये येऊ शकतो. OPPO Reno3 A या सीरीज मध्ये आता पर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये सर्वात हलका म्हणजे लो स्पेसिफिकेशन्स असलेला आहे. हा फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल कि नाही याची कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. चला जाणून घेऊया या फोनची वैशिष्ट्ये.

OPPO Reno3 A

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता ओपो रेनो3 ए ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.9 टक्के आहे. OPPO Reno3 A को 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्टेड आहे. ओपोने आपल्या या फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केली आहे.

OPPO Reno3 A एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. जापानी मार्केट मध्ये हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Reno3 A क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO Reno3 A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि सिम स्लॉट देण्यात आला आहे तर उजव्या पॅनल वर पावर बटण आहे. तसेच हा फोन यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,025एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. जापान मध्ये हा फोन 39,800 Yen म्हणजे जवळपास 28,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here