UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या

Highlights
  • यूपीआय अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करता येतो.
  • भारतात डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय खूप लोकप्रिय आहे.
  • भीम, पेटीएम, फोनपे प्रमुख यूपीआय आधारित अ‍ॅप आहेत.

यूपीआय (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजिटल पेमेंट्स अ‍ॅप भीम, पेटीएम, गुगल पे (जीपे) आणि फोनपेच्या मदतीनं युजर्स एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, खरेदीनंतर पेमेंट करू शकतात आणि गरज पडल्यास फोन रिचार्ज व बिलचं पेमेंट करू शकतात. यासाठी युजर्सना हे अ‍ॅप्स आपल्या बँक अकाऊंटशी लिंक करावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का भीम, पेटीएम, जीपे आणि फोनपे मधून लिंक्ड बँक अकाऊंटचा बॅलेन्स तुम्ही सहज चेक करू शकता. पुढे आम्ही या अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करण्याची पद्धत सांगितली आहे.

भीम अ‍ॅप मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये भीम अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : सर्वात वर बँक अकाऊंट्सवर क्लिक करा.

स्टेप 3 : ज्या बँकेचं अकाऊंट चेक करायचं आहे त्याच्या चेक बँलेन्स ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता.

पेटीएम मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम फोनमध्ये Paytm अ‍ॅप सिलेक्ट करा.

स्टेप 2 : नंतर बॅलेन्स अँड हिस्ट्री ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : तिथे बँकेच्या नावासमोरील चेक बॅलेन्स बटनवर टॅप करा.

स्टेप 4 : तुमचा यूपीआय पिन टाकून तुम्ही तुमचा बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता.

जीपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम पेजवर थोडं स्क्रोल केल्यावर चेक बँक बॅलेन्सचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून सबमिट बटनवर टॅप करा आणि बँक बॅलेन्स चेक करा.

फोनपेवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये फोन पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम स्क्रीनवर मनी ट्रांसफर सेक्शनवर चेक बँक बॅलेन्स ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3 : आता तुमची बँक सिलेक्ट करा आणि यूपीआय पिन एंटर करून बँक बॅलेन्स पाहू शकता.

यूपीआय आधारित अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनवर युजर्स एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करू शकतात. डिजिटल पेमेंटसह युजर्स सहज आपलं बँक बॅलेन्स चेक करू शकतात आणि अ‍ॅप मधून केलेले ट्रँजॅक्शन देखील बघू शकतात.

Published by
Siddhesh Jadhav
Tags: PaytmUPI