Xiaomi ने साल 2018 मध्ये आपला सब-ब्रँड म्हणून Pocophone सादर केला होता. या ब्रँड अंतर्गत पहिला स्मार्टफोन Poco F1 लॉन्च झाला होता जो स्मार्टफोन यूजर्सना खूप आवडला होता. पोको एफ1 तेव्हाच्या सर्वात दमदार चिपसेट वर लॉन्च झाला होता. गेल्या काही दिवसांत Pocophone चे दोन स्मार्टफोन समोर आले आहेत जे Poco F2 आणि Poco X2 नावाने लीक झाले आहेत. चर्चा अशी आहे कि हे स्मार्टफोन लवकरच बाजारात येतील. पण या दोन्ही फोन्सच्या आधी पोको फोन बद्दल एक मोठी घोषणा झाली आहे कि आता POCO Xiaomi पासून वेगळा होत आहे. हा शाओमीचा सब-ब्रँड राहणार नाही तर एक इंडिपेंडेंट ब्रँड म्हणून आपले डिवाईस लॉन्च करेल.
POCO ची Xiaomi पासून वेगळे होण्याची माहिती शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून दिली आहे. मनु जैन यांच्या ट्वीटने सांगितले कि पोको आता भारतात शाओमी पासून वेगळा झाला आहे तसेच कंपनीने प्रसिद्धी पत्रक पाठवून Xiaomi आणि POCO च्या वेगळे होण्याची सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शाओमीचा सब-ब्रँड म्हणून पोको ने आतापर्यंत फक्त एकच स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आणि आता पुढे या ब्रँड द्वारे जे फोन लॉन्च केले जातील ते पोकोचे असतील आणि या आगामी स्मार्टफोन्स मध्ये शाओमीची भागेदारी नसेल. आता POCO फोन्ससाठी वेगळी कंपनी, वेगळे सर्विस सेंटर, वेगळे स्टोर्स आणि वेगळी वेबसाइट असू शकते. लक्षात असू दे कि Realme पण आधी OPPO चा सब-ब्रँड म्हणून आला होता जो नंतर इंडिपेंडेंट ब्रँड बनला.
Excited to share: #POCO will now be an independent brand!
What started as a sub-brand within Xiaomi, has grown into its own identity. POCO F1 was an incredibly popular phone. We feel the time is right to let POCO operate on its own.
Join me in wishing @IndiaPOCO all the best.
— Manu Kumar Jain (@manukumarjain) January 17, 2020
POCO X2
पोको एक्स2 बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर या फोनच्या नावासह इतर काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याची बाब गीकबेंच वर समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर POCO X2 मध्ये चिपसेटच्या जागी ‘phoenixin’ लिहिण्यात आले आहे. हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.
POCO X2 गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता पोको एक्स2 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 547 प्वाइंट्स मिळाले आहेत तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1767 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच व्यतिरिक्त POCO X2 च्या इतर कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आली नाही. त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्च बद्दल अजूनही काही म्हणणे कठीण आहे.
POCO F2
पोको एफ2 बद्दल बोलायचे तर एका टिपस्टरने आपल्या ट्वीट मध्ये Poco F2 चे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट शेयर केला आहे. हे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन Xiaomi ने भरले आहे ज्यात स्पष्टपणे Poco F2 लिहिण्यात आले आहे. शेयर केल्या गेलेल्या डाक्यूमेंट्स मध्ये एक फाइल इग्रंजी मध्ये आहे तर दुसरी फाइल चीनी भाषेत आहे. ट्रेडमार्क मध्ये पोको एफ2 च्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन्सची खास माहिती मिळाली नाही पण हे डाक्यूमेंट समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Pocophone द्वारे Poco F2 अवश्य लॉन्च केला जाईल आणि येत्या काही आठवड्यांत या स्मार्टफोनची अधिकृत माहिती पण कंपनी टीज करू शकते.
पोकोफोन ग्लोबल हेड Alvin Tse च्या एका ट्वीट बद्दल बोलायचे तर एलविन यांनी एका व्यक्तीच्या ट्वीटला रिप्लाई करत Poco F2 बद्दल पोस्ट केली होती. ट्वीटर यूजरने पोको ब्रँड कडून Poco F1 चा सक्सेसर म्हणजे आगामी वर्जन बद्दल विचारले होते, ज्याचे उत्तर देताना एलविन यांनी लिहिले कि, “You will hear more from POCO in 2020.” म्हणजे तुम्ही साल 2020 मध्ये POCO बद्दल खूप काही ऐकणार आहात. एलविन यांनी काही वेळात आपले ट्वीट डिलीट केले. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात होते कि Poco F2 नावाने नवीन फोन शाओमी द्वारे लॉन्च केला जाऊ शकतो. POCO च्या कोणत्याही आगामी फोन बद्दल अजूनतरी ठोस काही बोलता येणार नाही.















