शाओमी ने भारतात आपला सब ब्रांड ‘पोको इंडिया’ लॉन्च करून इंडियन टेक बाजारात मोठा बदल केला आहे. कमी किंमतीत स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असलेला स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च झाल्यानंतर इतर कंपन्या पण कमी किंमतीत जास्त स्पेसिफिकेशन्स देण्याचे प्रयत्न करत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पोको इंडिया 20,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे. आता पर्यंत हा फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येत होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनी ने पोको एफ1 आॅफलाईन बाजारात पण सेल साठी उपलब्ध केला आहे.
पोको इंडिया ने घोषणा केली आहे कि पोको एफ1 जो आता पर्यंत फक्त शाओमी च्या वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर विकला जात होता, तो आता या दोन्ही प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल. शाओमी च्या इतर हिट स्मार्टफोन्स प्रमाणे आता पोको व शाओमी फॅन्सना आपल्या या आवडीच्या फोन साठी वाट बघावी लागणार नाही. पोको इंडिया ने सांगितले आहे कि पोको एफ1 13 ऑक्टोबर पासून मी होम वर सेल साठी उपलब्ध होईल तर 17 ऑक्टोबर पासून शाओमी संबंधीत सर्व रिटेल स्टोर्स वरून पण हा फोन विकत घेता येईल.
पोको एफ1 ची किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरीएंट 20,999 रुपये तसेच 6जीबी/128जीबी स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. कंपनी ने पोको एफ1 चा एक स्पेशल आरमर्ड एडिशन पण सादर केला आहे जो 8जीबी रॅम सह 256जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. या स्पेशल वेरिएंटची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
पण वरील किंमती पोको एफ1 च्या आॅनलाईन किंमती आहेत. कंपनी ने अजून सांगितले नाही कि पोको एफ1 आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण त्याच किंमतीत उपलब्ध होईल कि किंमती वाढतील. शाओमी आपले सर्व फोन 500 रुपयांनी जास्त किंमतीत रिटेल स्टोर्स वर विकते. कदाचित पोको एफ1 पण 500 किंवा 1000 रुपयांनी जास्त किंमतीत आॅफलाईन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.
पोको एफ1 स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो या प्राइस रेंज मध्ये आणण्यात आला आहे. पोको एफ1 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा















