POCO F3 5G झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 20MP सेल्फी कॅमेरा आणि 4,520mAh ची बॅटरी

Poco ने आज ग्लोबल टेक मंचावर आयोजित केलेल्या इवेंटमध्ये आपले दोन नवीन फोन्स लॉन्च केले आहेत. या इवेंटमध्ये कंपनीने Poco F3 Poco X3 Pro सह ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. नवीन पोको एफ3 बद्दल बोलायचे तर हा रेडमी के40 चा रीब्रँडेड वर्जन आहे. त्यामुळे आधीच स्पष्ट झाले होते की यात सर्व स्पेसिफिकेशन पण रेडमी के40 चे असतील. Redmi K40 फोन कंपनीने चीन मध्ये फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. चला पोको एफ3 प्रो 5G बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

एक नजर POCO F3 5G च्या लुकवर
POCO F3 चा लुक पाहता हा फोन अगदी Redmi K40 सारखा आहे. फक्त पोकोने आपल्या ब्रँडिंगसह सादर केला आहे. डिजाइन पाहता फोन बेजल लेस डिस्प्लेवर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे. या होल-पंच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. डिसप्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्स असलेल्या आहेत. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये दोन लेंस मोठ्या अकराच्या आहेत तर उजवीकडे छोटा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

POCO F3 5G चे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
पोको एफ3 फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, फोन ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि फोन मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP चा सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तीसरा मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट आहेत. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,520mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

किंमत
POCO F3 ची किंमत पाहता 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 349 यूरो (जवळपास 30,000 रुपये) पण, Early Bird ची किंमत 299 यूरो (जवळपास 26,000 रुपये) आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 399 यूरो (जवळपास 34,000 रुपये) आहे. पण हा वेरिएंट पण Early Bird मध्ये 349 यूरो मध्ये (जवळपास 30,000 रुपये) मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here