फक्त 8998 रुपयांमध्ये मिळत हा पावरफुल 5G फोन, जाणून घ्या ऑफर माहिती

पोकोने गेल्यावर्षी आपल्या दमदार POCO M6 5G स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच केले होते. हा स्वस्त फोन काही काळामध्ये अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर आणि पण कमी किंमतीत विकला जात आहे. डिव्हाईसवर डिस्काऊंट सोबत नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर पण मिळेल. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची नवीन किंमत आणि सर्व ऑफर सविस्तर सांगतो.

POCO M6 5G ऑफरची माहिती

  • Poco M6 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम+128GB स्टोरेज आणि 6GB रॅम +128GB स्टोरेजवर 1,501 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे.
  • ऑफरनंतर तुम्ही स्मार्टफोनच्या बेस मॉडेलला मात्र 8,998 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर 6GB रॅम +128 जीबी 9,998 रुपयांमध्ये मिळेल.
  • लाँच किंमत पाहता वरती दिलेले मॉडेल 10,499 रुपये आणि 11,499 रुपयांमध्ये आले होते.
  • डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय पण उपलब्ध आहे त्याचबरोबर ब्रँड 8,500 रुपये पर्यंत एक्सचेंज बोनस पण देत आहे.
  • जर तुम्ही अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत तर यावर पण तुम्हाला 5 टक्के पर्यंत कॅशबॅक मिळेल.
  • डिव्हाईससाठी युजर्सना ओरियन ब्लू आणि गॅलेक्टिक ब्लॅक सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.

POCO M6 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेट
  • 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज
  • 50MP ड्युअल रिअर कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी

डिस्प्ले: POCO M6 5G फोनमध्ये 6.74 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यावर 90Hz रिफ्रेश रेट आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 लावला आहे.

प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेट मिळते. ज्यामुळे युजर्सना जबरदस्त स्पीड आणि गेमिंग परफॉर्मन्स मिळेल.

स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 8GB रॅम +256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. यात रॅमला वाढवण्यासाठी टर्बो रॅमला सपोर्ट आणि इंटरनल स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळतो.

कॅमेरा: POCO M6 5G स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एक AI कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत POCO M6 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

इतर: मोबाईलमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, वाय-फाय सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

ओएस: POCO M6 5G अँड्रॉईड 13 आधारित एमआईयुआय 14 वर आधारित होता. कंपनी त्याचबरोबर दोन अँड्रॉईड अपडेट आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here