व्हाट्सॅप वरून पण करता येईल ग्रुप वीडियो कॉल, एक साथ बोलता येईल 4 जणांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आज भारतातील जवळपास प्रत्येक स्मार्टफोन मध्ये व्हाट्सॅप वापरला जातो. घरातील सर्वच आपल्या नातेवाईकांशी व मित्रांशी व्हाट्सॅप वरून चॅटिंग करतात. हा अॅप फक्त मनोरंजनासाठीच वापरला जात नाही तर आॅफिशियल कामांमध्ये पण याचा वापर होतो. टेक्स्ट मेसेज आणि वॉयस मेसेज नंतर व्हाट्सॅप यूजर्स सध्या वी​डियो चॅट चा पण जोरदार वापर करत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दूर असलेल्या नातेवाईकांशी वीडियो कॉलिंग वरून बोलतात. स्मार्टफोन यूजर्स जेवढं प्रेम व्हाट्सॅप वर करतात, व्हाट्सॅप पण आपल्या यूजर्स ची तेवढीच काळजी घेतो. अनेक चांगले चांगले फीचर्स आणल्यानंतर आज व्हाट्सॅप ने देशात असा नवीन फीचर पण रोलआउट केला आहे ज्यामुळे एक साथ 4 लोकांशी वीडियो चॅट करता येईल.

व्हाट्सॅप ने आज भारतात ग्रुप वीडियो कॉलिंग फीचर रोल आउट केला आहे. आता पर्यंत एका वेळी एकाच व्यक्तिला वीडियो कॉल करता येत होता, पण आता नवीन फीचर आल्यामुळे एक साथ 4 लोकांशी वीडियो चॅट करता येईल. व्हाट्सॅप ने हा अपडेट आज पासून संपूर्ण देशात जाहीर केला आहे. कंपनी ने एंडरॉयड स्मार्टफोन तसेच अॅप्पल आयओएस दोन्ही वर ग्रुप वी​डियो कॉल चा फीचर सादर केला आहे जो आगामी काळात सर्व सर्कल्स मध्ये उपलब्ध होईल.

व्हाट्सॅप ने सादर केलेला हा नवीन फीचर वापरून ग्रुप वीडियो कॉल सोबतच ग्रुप वॉयस कॉल पण केला जाऊ शकतो. म्हणजे एक साथ 4 लोकांशी तुम्ही तुमच्या फोन वरून बोलू शकता. व्हाट्सऐप कडून या नवीन सर्विस साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तसेच हा फीचर पूर्णपणे इंटरनेट डेटा वर चालेल.

कसा करता येईल ग्रुप वीडियो कॉल
1. व्हाट्सॅप च्या या लेटेस्ट फीचर चा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुमचा अॅप अपडेट करा.

2. अॅप अपडेट करण्यासाठी खाली पुढील लिंक वर क्लिक करा :
आयफोन / एंडरॉयड

3. व्हाट्सॅप अपडेट झाल्यानंतर ज्या 4 कॉन्टेक्ट्सना वीडियो कॉल करायचा आहे त्यापैकी एका वर क्लिक करा.

4. वीडियो कॉल सुरू झाल्यानंतर ज्या व्यक्ति ने कॉल केला आहे त्याच्या स्क्रीन वर उजव्या कोपर्‍यात ‘अॅड मोर’ चे चिन्ह येईल.

5. अॅड मोर वर क्लिक करताच तुमची व्हाट्सॅप कॉन्टेक्ट लिस्ट ओपन होईल.

6. ज्या दुसर्‍या व्यक्तिला वीडियो कॉल करायचा आहे त्याच्या कॉन्टेक्ट वर क्लिक करा, ती व्यक्ति पण वीडियो कॉल मध्ये जोडली जाईल.

7. चौथ्या व्यक्ति ला वीडियो कॉल मध्ये जोडण्यासाठी पुन्हा अॅड मोर वर क्लिक करून त्याचा कॉन्टेक्ट अॅड करावा लागेल.

लक्षात असू दे कोणीही नवीन व्यक्तीला अॅड करू शकतो. एक एक जण जोडला गेल्या नंतर फोनचा डिस्प्ले आपोआप 4 भागांमध्ये विभागाला जाईल. जर कोणी वीडियो कॉल रिसीव केला नाही तर अशा स्थितीत इतरांचा वीडियो कॉल बिना दिक्कत चालू राहील. पण जर तुम्ही आधी पासून वीडियो कॉल वर असाल तर तुम्ही नवीन वीडियो कॉल रिसीव करू शकणार नाही.

विशेष म्हणजे व्हाट्सॅप ने हा फीचर आजच जगभरता रोलआउट केला आहे. त्यामूळे तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी अजून एक दोन दिवस जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here