OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास

OnePlus NOrd

OnePlus बद्दल मागे बातमी आली होती कि कंपनी OnePlus Nord, OnePlus Nord N10 आणि OnePlus Nord N100 च्या यशानंतर सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो OnePlus Nord SE नावाने लॉन्च केला जाईल. वनप्लस नॉर्ड एसईचे अनेक स्पेसिफिकेशन्स अलीकडेच एका लीकच्या माध्यमातून पण समोर आले होते. पण आता या फोन बद्दल एका मोठ्या माहितीचा खुलासा झाला आहे जी OnePlus Nord SE संबंधित जुन्या सर्व लीक्स आणि रिपोर्ट्स पेक्षा वेगळी आहे.

OnePlus Nord SE बद्दल एका प्रख्यात टिपस्टरने दावा केला आहे कि हा स्मार्टफोन वनप्लसचा कोणताही नवीन किंवा वेगळा स्मार्टफोन नसून जुन्या OnePlus Nord स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. इथे Nord SE चा अर्थ पण Nord Special Edition असल्याचे सांगण्यात आले आहे. टिपस्टर नुसार फोनच्या मागील डिजाईन मध्ये नावीन्य दिसेल ज्यासाठी डिजाइनर Joshua Vides शी भागेदारी करण्यात आली आहे. तसेच नॉर्ड एसईचे स्पेसिफिकेशन्स पूर्णपणे OnePlus Nord स्मार्टफोन सारखे असतील.

OnePlus Nord

वनप्लस नॉर्डचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44-इंचाच्या Fluid AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. तसेच, यात प्रोटेक्शनसाठी फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Google आणि Microsoft ने या भारतीय ऍप मध्ये गुंतवले 100 मिलियन डॉलर, बनेल देशी टिकटॉक

OnePlus Nord 5G कंपनी द्वारे अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो आक्सिजनओएस सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. OnePlus च्या या फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, जे चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे.

वनप्लस नॉर्ड व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here