नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड

BattleGround Mobile India चा टीजर

तुम्ही त्या लोकांपैकी आहेत जे PUBG Mobile ची आतुरतेने वाट बघत आहेत? कोरोना विषाणूमुळे घर बसल्या तरुण आणि लहान मुलांना नक्कीच या मोबाईल गेमची खूप आठवण येत असेल. पण आता तुमचे ‘दुःख’ लवकरच संपणार आहे. पबजी फॅन्ससाठी खूप मोठी बातमी समोर आली आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile चा नवीन वर्जन ऑफिशियली लॉन्च केला आहे. हा नवा, अ‍ॅडव्हान्स आणि मजेशीर पबजी गेम आता भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने खेळाला जाईल. (PUBG Mobile Release date Download Battle Ground Mobile India game)

वरील व्हिडीओ बघून तुमचा उत्साह शिगेला पोहोचला असेल. साउथ कोरियन व्हिडीओ गेम डेवलेपर कंपनी KRAFTON ने आज अधिकृतपणे आपल्या नवीन गेमच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने हा मोबाईल गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने सादर केला आहे जो PUBG Mobile चा नवीन आणि उन्नत वर्जन आहे. हा पण वर्ल्ड क्लॉस AAA multiplayer गेम आहे जो खास भारतीय ग्राहकांना लक्षात थुइन बनवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे Galaxy F22 स्मार्टफोन, असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

पूर्वीपेक्षा जास्त मजेदार

BATTLEGROUNDS MOBILE INDIA चा गेमिंग एक्सपीरियंस PUBG Mobile पेक्षा पण जास्त मजेशीर आणि रोमांचक असेल. क्रॉफ्टन ने सांगितले आहे कि हा पण एक फ्री-टू-प्ले गेम असेल ज्यात आधीच्या पबजी प्रमाणे टूर्नामेंट्स आणि लीग्स आयोजित होतील. तसेच गेममध्ये प्लेयर स्कीन आणि आउटफिट पण आधीप्रमाणे मिळतील. गेमच्या टीजरने पण याचा अनुभव पण पूर्वीसारखा असेल याची हिंट दिली आहे.

पबजी मोबाईल गेममधील स्क्रिनशॉट

कधी करता येईल डाउनलोड

टीजर प्रसिद्ध करताना कंपनीने BATTLEGROUNDS MOBILE INDIA देशात सादर तर केला पण कंपनीने अजूनतरी या गेमच्या डाउनलोड डेटवरून पडदा हटवला नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फोन डाउनलोड किंवा इंस्टालसाठी उपलब्ध करवण्याआधी कंपनी रजिस्ट्रेशन सुरु करेल आणि या मोबाईल गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करावे लागेल. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया फक्त भारतीय बाजारात खेळण्यासाठी उपलब्ध होईल आणि अशा आहे कि या महिन्याच्या शेवटी किंवा या जूनमध्ये हा गेम सर्व युजर्ससाठी डाउनलोड आणि खेळण्यासाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here